सांधण व्हॅली... प्रथम चरण
माज मोडणारी "सांदण दरी (व्हॅली)" लिहायचं म्हटल कि सुरवात कुठुन करावी समोर येणारा पहिला यक्ष प्रश्न पण "सांधण व्हॅली" बद्दल लिहाताना हा प्रश्न सुद्धा गौण वाटतो... कारण ह्या ट्रेक पर्यंत आम्ही सगळे अचानक भयानक मित्र मंडळाचे कार्यकर्ते होतो....ह्या ट्रेकने आम्हांला only ट्रेकर्स पासुन organising ट्रेकर्स बनवलं.... असोत.... मंदार भावे(हे एक अजब आणि वेगळ रसायन ह्याच्या बद्दल वेगळा लेखकच लिहावा लागेल)ह्याला सहजच विचारल की 'कुठे जाणार आहे का ट्रेकला?'त्याच उत्तर आल 'हो...आहे ना चल' झाल इथुन आमची सुरुवात कधी निघायचं,कस जायचं,काय ....घ्यायचं इ प्राथमिक सोपास्कारानंतर मी,माझा मित्र अमोल कांबळे (हा फोटोग्राफर मित्र ह्याला 'तुला तिकडे भरपुर खुराक मिळेल' अस सांगुनच तयार केलेला.)आम्ही दोघेजण मंदारच्या घरी धडकलो...गेल्यानंतर पाहिलं तर एक लहान मुलगा श्रीराम,अजुन काही मुली रविशा,रचना,ग्रेशा,मेधा,अमृता,कस्तुरी,वर्षा आणि मी,अमोल,रोहन,योगीराज,अश्विन,तेजस,तेजस(माझा मामे भाऊ)आणि...