रौद्र की रुद्र (हरिश्चंद्राची सफर)
हरिशश्चंद्रगडाची सफर..... कधी...कधी आपल्या नशीबाचा खेळ सुद्धा अजब असतो आपण एखादी "गोष्ट" मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करतो...पण ती वाळु सारखी निसटून जाते....आणि कधी कधी ध्यानी-मनी-गावी नसताना सुद्धा तीच "गोष्ट" आपल्या ओंजळीत अलगद "म्हातारीच्या केसा"(कपाशीच फळ) सारखी येऊन पडते .... पण त्यासाठी आपल्याला ओंजळीसाठी का होईना तळहात उचलायचा असतो आणि माझ्या समोर तो "म्हातारीचा केस"(कपाशीच फळ) आला आणि मी ओंजळ त्याच्या पुढ्यात नेली ...तो "केस" माझ्या ओंजळीत विसावा म्हणुन....यंदा हा"केस"माझ्यासाठी "हरिशश्चंद्रगडा"च्या रुपाने समोर आलेला होता... वास्तविक हा किल्ल्याचा ट्रेक माझा किमान ४-५ वेळा हुकलेला...त्याबद्दल मी मंद्या,अश्विन,तेजा..ह्यांना त्यांच्या "क्रुरते" बद्दल शिव्या,शाप सगळच देऊन झालेलं...त्यातही ह्या पठ्यांच्या विषय नाहीच...आणि ती संधी मला मिळालीच.....आम्ही सगळे जण "पंढरी वारी"च्या वारी सज्ज झालो, वारक-यांना "आषाढी एकादशी" झाली कि "कार्तिक एकादशी" चे वेध लागतात......