रौद्र की रुद्र (हरिश्चंद्राची सफर)


 हरिशश्चंद्रगडाची सफर.....

कधी...कधी आपल्या नशीबाचा खेळ सुद्धा अजब असतो आपण एखादी "गोष्ट" मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करतो...पण ती वाळु सारखी निसटून जाते....आणि कधी कधी ध्यानी-मनी-गावी नसताना सुद्धा तीच "गोष्ट" आपल्या ओंजळीत अलगद "म्हातारीच्या केसा"(कपाशीच फळ) सारखी येऊन पडते .... पण त्यासाठी आपल्याला ओंजळीसाठी का होईना तळहात उचलायचा असतो आणि माझ्या समोर तो "म्हातारीचा केस"(कपाशीच फळ) आला आणि मी ओंजळ त्याच्या पुढ्यात नेली ...तो "केस" माझ्या ओंजळीत विसावा म्हणुन....यंदा हा"केस"माझ्यासाठी "हरिशश्चंद्रगडा"च्या रुपाने समोर आलेला होता...
       वास्तविक हा किल्ल्याचा ट्रेक माझा किमान ४-५ वेळा हुकलेला...त्याबद्दल मी मंद्या,अश्विन,तेजा..ह्यांना त्यांच्या "क्रुरते" बद्दल शिव्या,शाप सगळच देऊन झालेलं...त्यातही ह्या पठ्यांच्या विषय नाहीच...आणि ती संधी मला मिळालीच.....आम्ही सगळे जण "पंढरी वारी"च्या  वारी सज्ज झालो, वारक-यांना "आषाढी एकादशी" झाली कि "कार्तिक एकादशी" चे वेध लागतात.....तसच आम्हाला ट्रेकवारीचे! हे पंढरीच्या वाटेवर चालतात आणि आम्ही ट्रेकवाटेवर फरक काय तो हाच!,आम्हाला "दिवाळी ट्रेक" झाला कि "उन्हाळ्यातला ट्रेक"चे वेध चालु होतात..... नेहमीप्रमाणे मंदारने "आजोबा" ह्या डोंगराच/किल्ल्याच नाव सांगुन "शठ्ठु" ठोकला..आणि आम्ही म-हाठे निघालो...पायलट ट्रेकला..बर गेलो खरे...पण आमचा भ्रमनिरास झाला...तेजा ने "एवढ्या वर कुठली आई आपल्या बाळाला पाळण्यात ठेवेल" म्हणुन डोंगराबद्दलची निराशा जाहिर केली..होती...थोड्या फार..फरकाने आम्हा सर्वांची हिच अवस्था...आणि हिच संधी साधुन मी माझ्या "राजकीय कौशल्याची"(हे सकारात्मक दृष्टिकोनांतून ह्याचा विचार करावा हि विनंती) चाचपणी केली...म्हणालो "तुमच्या सगळ्यांचे चेहरे सांगताय कि हा किल्ला कोणाला फारसा आवडलेला दिसत नाही..." सगळ्यांनी "हो" वर शिक्कामोर्तब केलं.."हरिशश्चंद्रगड करुयात" सगळे तयार झाले ना....बाप्पा ..... अन मग...
        नेहमीप्रमाणे तयारी सुरू आमची,फाॅर्मुला तोच.... तारीख ठरली १३,१४,१५ मे.... मैत्री संस्थेच १५व्या वर्षात पदार्पण म्हणुन कमीतकमी एक ५० सिटची बस तरी निघायला हवी... बाकी तयारीत जेवण यंदा मात्र आम्ही न बनवता तो कोणाला तरी बनवायला सांगायचा असच ठरलं त्यामुळे भांडी वगैरे घेण्याचा प्रश्नच नव्हता.....कारण आधी आलेल्या लोकांनपैकी कोणीच नीट,संपुर्ण किल्ला पाहिलेला नव्हता ह्या वेळेस तो संपुर्ण बघायचा..असंच बैठीकीत ठरलं होतं....सगळ्यांना निरोप पाठवणी सुरु केली......जुन्या अतरंगी कारट्यांमध्ये .....आता "वाढीव" कार्ट्यांची भर पडली...अश्विनने सँडी(संदीप),उत्सव,मयुर असले महारथी घेऊन आला...त्यातला सँडी...हे बेन "उत्तम" फोटो काढणारं(त्याचे फोटो आजतागायत मिळालेले नाहीत तरीपण सकारात्मक दृष्टिकोनाच्या विचारांशी प्रतारणा नको म्हणुन उत्तम) उत्सव,मयुर हे दोघही सँडी सारखे पहिल्यांदाच आलेले..पण सँडी जितका आमच्यात मिसळला तितके हे दोघे नाही मिसळले...असोत, हर एक की अपनी अपनी सोच होती हैं...त्याच बरोबर तेजस कडुन मीनल...ही पोर आपल्या चित्रांच्या रेषांमध्ये रमणारी...चित्रकार!आणि दुसरी ऋजुता हि इंटेरीअर डिझाईन शिकणारी आणि सतत बडबडणारी...त्याचबरोबर आरती,श्रद्धा ह्या भगिनी आणि एक कार्टुन अजिंक्य नावाच...
ह्या दोघांच्या उपर राचाने(रचना) मात्र बाजी मारली हि पोर १८ जणांना घेऊन आली....मानसी,अपुर्वा,अंकिता,मयांक,शार्दुल,युतिका ही १२ची कार्टी  (मुद्दाम १२चीच म्हणेन कारण १२वीची परिक्षा देऊन आलेले एम.एच १२ पासिंग कार्टी ) त्यातली ही नवीन... रविशा ने मात्र ह्या ट्रेक ला "टांग" मारली ...असोत अपनी अपनी सोच.........ह्या १८ मध्ये काहींतर शेवटच्या दिवशी म्हणजे निघायच्या दिवशी "हजर" झालेले....अगदी संध्याकाळी ६-७ वा.पर्यंत आम्ही ४८-४९ आकड्यांवर असणार माझ गणित हे मंदार च्या घरी गेल्यावर ५६ वर गेला...आणि माझी सटकली...राग आला,इतक बेजवाबदार वागण्याचा "अस कस करु शकतात..."आमच्या विचारण्याला काहिच अर्थ नाही...का??
खरतर त्यांच्या येण्यावर माझी काहीच हरकत नव्हती त्यांनी यावे हिच इच्छा,पण त्यांच्या येण्यामुळे ज्यांनी आधीच जागा निश्चित केल्या होत्या त्यांच्यापैकी कोणाला तरी उभे राहुन प्रवास करावा लागणार ..... आणि आम्हाला कोणालाही  कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये हिच भावना त्यापाठीमागे होती आणि ट्रेक लीड करण्याचं tension म्हणुनही असेल कदाचित माझी जास्त चिडचिड झाली....असोत मंदारने "मला माहित होत,येणार आहेत" म्हणुन वेळ नेली,पण ते आले...ह्या वेळेला माझ्या बरोबर माझी बहिण ऐश्वर्या आणि गौरी देखील आल्या होत्या...मंदार बरोबर जुन्यातला नविन(माझ्या बरोबर पहिल्यांदाच) खिलाडी रोहन बापट,त्याची मैत्रीण स्नेहल आणि मित्र तुषार नागे-पाटील ("पाटील" हे का लावतात हे न सुटलेल मला कोड आहे)... अण्णा ऋषिकेश असा सगळा जमाव ५६ जणांनपर्यंत गेला...सगळ्यांचे नावे...फोन नंबर..थोडक्यात हजेरी घेतली...
आणि आम्ही बस यायची वाट बघत होतो...बस आली तेव्हा परत नविन लफडं...बस बदलली होती,म्हणजे...दिखाया कुछ और दिया कुछ...हो-नाही करता करता...जी आली तिच्यात बसलो....नरेंद्र दादाच्या जुजबी सुचना ऐकुन....गणराया नाव घेऊन,आमचा रथ हरिशश्चंद्रगडाच्या दिशेने सोडला......
युध्दा वर निघालेले सैन्य जसे "रणशिंग" फुंकत जात....तसच आम्हीही "रणशिंग"(नाचायची गाणी वाजवत) फुंकत चाललो होतो ...त्याच अर्विभावात! फक्त फरक इतकाच की आमची रणवाद्य हि बस मधले स्पीकर्स होते...रणशिंग फुंकण्याच्या कामगिरी वर DJ SHAKTIMAN(सचिन शेठ) नियुक्त होते..(हे काम स्वतःहुन स्वीकारल) हे सगळ सुरु असताना...नारायणगावचा चहाचा वेळ वगळता..संपुर्ण रस्त्यात एकदाही गाण्यात कुठेही खंड पडला नाही आणि नाच थांबला नाही......
        माहोल हा आम्हाला सवयीचा आहे...कारण जातोच त्यासाठी नेहमीच्या कटकटी दुनियेत पासुन लांब जाऊन peace of mind ला कवेत घेण्यासाठी ... सगळेजण खुप उत्साही 
असतात ...नाचण,गाण..मजा,मस्ती व स्वतःच्या पुर्वजांनी केलेल्या सुर्वण कामगिरीची आठवण ठेवण्यासाठी..... झोप नसतेच मुळी ...नुसते राजा विक्रमा सारखे वेताळा(गिरीभ्रमण) च्या शोधाने झपाटलेले.....हे गड-किल्ले,सह्याद्रीचे डोंगर-नद्या-नाले-ओढे फिरून काय मिळत...? हा प्रश्न विचारणं म्हणजे राजा विक्रमाला वेताळाने "मी गोष्ट सांगत असताना,मध्ये बोललास तर मी परत झाडावर जाऊन बसेन" अशी अट घालण्यासारख आहे..... असोत

(हरीश्चंद्रगडा वर पोहण्याच्या तपशीलवार वाटा)

१) खिरेश्वर गावातून :- 
सर्वात प्रचलित असणारी वाट ही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर, ५ कि.मी अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेली आहे. आतील गाभार्‍याच्या दाराच्या चौकटीवर शेषशायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन गणेशगणेशानी ,वृषभवाहक शीवपार्वती , हंसवाहन ब्रह्म सरस्वती, मयूरवाहन स्कंदषष्टी, नरवाहन कुबेरकुबेरी, मकरवाहन मकररति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला ’नागेश्वराचे मंदिर’ असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. 
अ) एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात हरीश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहचते. टोलार खिंडीत वाघाचे शिल्प पाहायला मिळते.
ब) दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेणे आवश्यक आहे, कारण वाटेत कुठेच पाणी मिळत नाही. 

२) नगर जिल्ह्यातून ( पाचनई मार्गे) :-
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई - नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर - पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ किमी आहे. 

३) सावर्णे - बेलपाडा - साधले असा घाटमार्ग :- 
गड सर करण्यासाठी सावर्णे - बेलपाडा - साधले असा घाटमार्ग आहे. मुंबई - माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गाव आहे. सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ - ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्‍या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई - माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात. बेलपाडा गावातून साधले घाट मार्गे हरिश्चंद्रगडावर जाता येते. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. येथून बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे १० ते १२ तास लागतात.

४) नळीची वाट :-
हरिश्चंद्रगडावर जाण्याची सर्वात कठीण वाट म्हणजे नळीची वाट आहे. नळीच्या वाटेने जाण्यासाठी बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून हरिश्चंद्रगड व बाजूच्या डोंगराच्या मधल्या अरूंद घळीतून कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. बेलपाडा गावात जाण्यासाठी, मुंबई - माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ - ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्‍या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई - माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात. बेलपाडा गावातून कोकणकड्याच्या दिशेने चालत जाऊन ओढा पार करावा लागतो. चार वेळा ओढा पार केल्यावर वाट कोकणकडा व बाजूचा डोंगर यांच्या मधल्या अरूंद घळीतून वर चढत जाते.ही वाट फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गाने कोकणकड्याच्या पठारावर जाण्यास सुमारे ८ ते १२ तास लागतात.(साभार ट्रेकक्षितिज)

          सकाळी ६.३० च्या आसपास आम्ही सगळे जण "पाचणाई" ह्या गावात पोहचलो..सकाळचे वातावरण मोहुन टाकणारं होत...धुकयाची झालर नुकतीच ओसरायला सुरुवात झाली होती..अधुन-मधुन कोंबड्याचे बांग देण्याचे आवाज कानावर पडत होते..चिमण्यांची "चिव-चिव" हृदयाला येऊन भिडत होते..हे सगळं मी,गेंगजे काका अनुभवत होतो...बस मोकळ्या जागी लाऊन... चालकाला आमच्या एकुणच कार्यक्रमाची कल्पना मंदार ने दिली...त्याच बरोबर मी,अश्विन,तेजस ने बाकी सर्वांना चढण्याची तयारी करायला सांगितली.... चहा घेता-घेता सर्वजणांना ह्या वेळला आम्ही  स्वतःहुन सर्वांना किल्ला चढण्याबाबत काही निकष पाळायला सांगितले..हे आमच्या नियोजनाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे...नियोजना भाग होता...२ गटांमधले कमाल अंतर किती असावे..आपण आणलेल सामान आपल्या क्षमतेला अनुसरुन असावे...ह्या सर्वां पाठिमागचा उद्देश  हा आपण सगळे एक आहोत ही भावना..प्रत्येकाने आपल्या स्वतः बरोबरच इतरांची काळजी कशी घ्यावी...सर्वजण एका हेतुने बांधलेले आहोत, आपण ह्या भुमिचे,ह्या निसर्गाचे काहितरी देण लागतो हि भावना वाढीस लागावी...शहरी life style जगत असताना गावा-गावांचा स्वभाव माहित करुन घेणं....ह्या सगळ्या विचारांनंतर finally आम्ही निघालो.....
सकाळचा प्रहर....सुर्यनारायणाने आपल प्रभाव दाखवायला सुरुवात केली...हवेतल्या गारव्याने देखील आपली मुळची शीतलता सोडुन सोनेरी किरणांच्यामध्ये समरस व्हायला सुरुवात केली..जणु हि त्यांच्या स्वागताची पद्धतीच होती....निसर्ग हा बदल सुद्धा खुप शांत चित्ताने करत होता..हा बदलाची झळ सुद्धा पामराला पोहचु देत नव्हता...जणु आपल्या कृतीतून मनुष्याला..एक संदेश देत होता...परीवर्तन हे होणार,ते होतच..पण ते कस होत .हे जास्त महत्त्वाचे ...

मी..ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत होत...गारव्याच सुर्योदयाबरोबर समरस होणे...गारव्याचा मखमली स्पर्श.....वाटही भलतीच सुंदर होती...झाडांची आच्छादने,मळलेली ठळक वाट.. तासाभराच्या पायपीटी नंतर आम्ही धबधब्याच्या कडेवरच्या वाटेने चालायला लागलो...पण तिथेच आमची मंडळी बसलेली दिसली...जवळ गेल्यावर कळाल मीनल तिथे बसुन तिच स्केच पुर्ण करत होती...कमाल वाटली ह्या मुलीची  उन्हात बसुन हि मुलगी स्केच पुर्ण करतेय......मी तिथेच बसलो ...कारण मला माझ्या कोणीही शिल्लक राहायला नको होत....तिचं स्केच पुर्ण झाल....पण मी बघण्याचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही....सुचलच नाही....
साधारणपणे ३ तासाच्या पायपीटीनंतर  आम्ही एकदाचे हरीश्चंद्रेश्वराच्या मंदिरात पोहचलो...आमच्या आधीच थोडीफार मंडळी होती तिथे....सर्वांनचे बस्तान जमल्यावर जेवायच्या तयारीला लागलो ....अर्थात आम्हाला करायच काहीच नव्हतं.... आधीच ठरल्याप्रमाणे आम्ही फक्त सामान देऊन...स्वयंपाक बनवायला देणार..श्री.पोपटराव बधड (संपर्क:7507026119) हे संपुर्ण कुटुंब दोन दिवस आमच्या पोटाची खळगी भरणार होते...व्यक्ती बोलायला एकदम साधी...जरा सुद्धा आवाजात अहंकार नाही...आम्ही आणलेलं सामान,भाजी देऊन मी सुटलो....आणि हात-पाय ..तोंड धुण्यासाठी आणि रात्रीला वस्तीसाठी जागा बघायला निऊन आलो ....बाकी सगळे पाण्यात खेळायला सुरुवात केली..होती तिथुनच माझी ओरडायला सुरुवात....पाण्यात खेळु नका...पण ऐकतील तर शप्पथ...शरयु,मानसी,अपुर्वा,अंकिता...जवळपास सगळ्याच मुली पाण्यावर.... ..खेळायला त्यांना उठवायच म्हणजे...कसरत नुसती...एक ऐकत नव्हत्या.....त्यांचा नाद सोडुन मी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाक्या पाशी गेलो....क्रमशः



Comments

Popular posts from this blog

सांधण व्हॅली... प्रथम चरण

आठवणीतला 'राजमाची'

रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)