Posts

Showing posts from 2018

हरिहर आणि ब्रम्हगिरी

Image
वाटाड्याच पहिलं पाऊल.... "सौंदर्य" कस असावं?तर त्याचा मर्म आणि धर्म दोन्ही मुळचेच सुंदर असणं किंवा सर्व स्तरावर उच्च कोटीची  सुंदरता....हिच त्याची व्याख्या,  "हरीहर" आणि "ब्रम्हगिरी" ह्यांना चपखल बसते.... आमच्या "सांधण व्हॅलीच्या" ट्रेक नंतर मे महिन्यातल्या आमच्या पुढचा "रांगणा किल्ल्याचा" ट्रेक कमी संख्येअभावी रद्द करावा लागला आणि  ह्या नंतर,ट्रेक कुठे न्हायचा?असा प्रश्न उदभवलाच नाही कारण मंदार भावे ते काम १००% चोख करतो आणि त्यान सांगितले "हरीहर" आणि "ब्रम्हगिरी" करु.....नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हे किल्ले...ठरलं मग! मागचा अनुभव (सांधणव्हॅली चा) लक्षात घेता पायलट ट्रेक न करता कुठलाही किल्ला निश्चित करायचा नाही ही काळ्या दगडावर पांढरी रेघच मारुन ठेवली!      पुढे कोणी पायलट ट्रेक करावा? ह्या चर्चेचा शेवट तेजा(तेजस गुरव) आणि अॅशले(अश्विन गंगाणी) ह्यांचा नावावर येऊन थांबला तेजस,अॅशले आणि तेजसचा रोहन नावाचा मित्र हे पायलट ट्रेकला गेले.हे जाऊन आल्यावर किल्ला "मस्त,छान,चांगला,सुंदर" ह्या...