हरिहर आणि ब्रम्हगिरी
वाटाड्याच पहिलं पाऊल....

"सौंदर्य" कस असावं?तर त्याचा मर्म आणि धर्म दोन्ही मुळचेच सुंदर असणं किंवा सर्व स्तरावर उच्च कोटीची सुंदरता....हिच त्याची व्याख्या,
"हरीहर" आणि "ब्रम्हगिरी" ह्यांना चपखल बसते....
आमच्या "सांधण व्हॅलीच्या" ट्रेक नंतर मे महिन्यातल्या आमच्या पुढचा "रांगणा किल्ल्याचा" ट्रेक कमी संख्येअभावी रद्द करावा लागला आणि ह्या नंतर,ट्रेक कुठे न्हायचा?असा प्रश्न उदभवलाच नाही कारण मंदार भावे ते काम १००% चोख करतो
आणि त्यान सांगितले "हरीहर" आणि "ब्रम्हगिरी" करु.....नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हे किल्ले...ठरलं मग! मागचा अनुभव (सांधणव्हॅली चा) लक्षात घेता पायलट ट्रेक न करता कुठलाही किल्ला निश्चित करायचा नाही ही काळ्या दगडावर पांढरी रेघच मारुन ठेवली!
पुढे कोणी पायलट ट्रेक करावा? ह्या चर्चेचा शेवट तेजा(तेजस गुरव) आणि अॅशले(अश्विन गंगाणी) ह्यांचा नावावर येऊन थांबला तेजस,अॅशले आणि तेजसचा रोहन नावाचा मित्र हे पायलट ट्रेकला गेले.हे जाऊन आल्यावर किल्ला "मस्त,छान,चांगला,सुंदर" ह्या विशेषणांनी मनातली उत्कंठा वाढायला लागली पण ह्या उत्कंठे बरोबर आलेल जवाबदारीच दडपण ,१५ वर्षांपुर्वी सुरु झालेला"मैत्री संस्था"बरोबरचा आमचा प्रवास आता मी,मंदार,तेजस,अश्विनसाठी एक नविन भुमिका घेऊन आलेला होता हि भुमिका व्हॅलीच्या ट्रेक नंतर अजुनच परीपक्व झालेली......
जवाबदारी आली की त्याच दडपण येण हे स्वाभाविकच!,पण निभावणं? म्हणजे नुसती तारेवरची कसरत नव्हे तर वादळात हेलकावे खाणा-या गलबताला सावरण्या-या कप्तानासारखी अवस्था....असोत आमच्या पायलट ट्रेक नंतर पुर्ण नियोजनाची वेळ आली १३,१४,१५ नोव्हेंबर तारीख ठरली.
नियोजनात सर्वात महत्वाचा मुद्दा हा येणारी संख्या! ३५ ही संख्या निश्चित केल्यावर ती कुठुन आणि कसे येणार? यावर एक उपाय आम्ही शोधला,उपाय जुनाच होता पण तो नव्याने पण प्रभावीपणे राबवायचा अस ठरलं.
आपल्या परीचयाच्या सगळ्यांना निरोप पोहचवावा त्यातुन संख्या वाढवावी हाच उपाय कामी आला आणि जुन्या लोकांमध्ये काही नविन मंडळी आमच्या ताफ्यात दाखल झाली,तेजस कडुन गौरव,शरयु,संपदा इ.,अश्विन कडुन सौरभ,रवि,फिलोमीना ही मंडळी माझ्या कडुन माझे जिजु स्नेहलराव,भाचा सुमित,त्यांचा चुलत भाऊ अक्षय,वैभव ही, मंदार कडुन वैष्णवी इ.....
हि सगळी मंडळी अतरंगी कार्टी,अवलि,उनाड,राडा घालणारी प्रत्येका मध्ये काही ना कौशल्य,"कार्टी"हाच शब्द Perfect आहे असच वाटणारी हि मंडळी....
आमच्या नियोजनाचा अन्य दुसरा महत्वाचा घटक सामानाची जुळवाजुळव आणि किराणा आणणे,भाजी आणणे,पातेली घेणे हे सगळं जमवता जमवता दमछाक व्हायची पातेली,कालथा,डाव,सु-या स्वतःच्या नसल्याने ते भाड्याने आणव्या लागल्या भाज्या आणि किराणा मंदारच्या घरी पोहचला.....
सर्व काम आधीच उरकून १३ तारखेला मी,जिजु,सुमीत,अक्षय, वैभव मंदारच्या घरी दाखल झालो रात्री सगळी जमलो पण नेहमीप्रमाणे ह्या वेळला सुध्दा late latif होतीच, नेहमीप्रमाणे बस याही वेळ ला आम्ही रात्री १२ च्या शुभ मुहूर्तावरच हलवली बस तळेगाव-चाकण-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेरला आली,संगमनेर मध्ये वाटेत एका हाॅटेल मध्ये फक्कड चहा आणि दुधाचा बेत रंगला चहा झाल्यावर बस निघाली ती थेट त्र्यंबकेश्वरला येऊन थांबली,आम्ही थांबलो त्यावेळी साधारण ५.३०,६.०० वाजले होते त्र्यंबकेश्वर! हे बारा ज्योर्तिलिंगा पैकी एक असलेल ज्योर्तिलिंग वातावरण सुध्दा तसच 'धार्मिक' त्र्यंबकेश्वरमध्ये आंघोळ आणि नाश्ता व बाकी नैसर्गिक विधींसाठी म्हणुन श्री गजानन महाराज ट्रस्टची निवड केली होती... त्र्यंबकेश्वरात ट्रस्टची मोठी प्रशस्त इमारत,अन्नछत्र मंडळ,श्री.गजानन महाराजांच संगमरवरी मंदिर इ खुप सुंदर वसवलेल आहे हे ट्रस्ट भक्तांसाठी लाॅज पण उपलब्ध करुन देतात त्यांनीच आम्हांला एक मोठा हाॅल उपलब्ध करुन दिला हा हाॅल जरा अपेक्षेपेक्षा मोठाच होता सगळ्यांना आवरायला सांगुन आम्ही बाकी नाश्ताची व्यवस्था पाहण्यासाठी
गेलो...व्यवस्था खुप सोपी होती...पैसे देऊन कुपन्स घ्यायचे,फक्त सेल्फ सर्व्हिस मुळे गर्दी तेवढी होते पण आम्ही लवकर पोहोचल्यामुळे तोही प्रश्न नव्हता सगळ्यांना जबरदस्तीने आवरायला लावुन न्याहरीसाठी पिटाळले कारण इथे अन्नछत्र मंडळाच्या काऊंटरच्या वेळा निश्चित आहेत ठरलेल्या वेळेतच न्याहरी आणि जेवण मिळते न्याहरी स.८.०० ते ९.३०...व जेवण दुपारी १२.०० ते २.०० यावेळेतच मिळतं न्याहरी करायला बसल्यावर उपमा,पोहे,साबुदाणा खिचडी असे पदार्थ होते ह्यांची किंमत ११ रु. प्रत्येकी एक प्लेट इतकी माफक मला खर आश्चर्य तर पुढे वाटलं कारण मी खात असलेला उपमा..हा चक्क! साजुक तुपात बनवला होता त्याची चव अप्रतिमऽऽऽऽऽऽ लागत होती मुळचा मी खाण्यात तरबेज असल्या कारणाने 'मला आवडला' ह्याचच जास्त आश्चर्य वाटलं पण खरच राव! उपमा "दर्जा"च होता न्याहरी झाल्यावर आणि नंतर त्या आवडलेल्या जागेचे,मंदिराचे फोटोज घेऊन आम्ही आमच्या या मोहीमतल्या पहिल्या किल्ल्याच्या "ब्रम्हगिरीच्या" दिशेने प्रयाण केले.
मनमोहक ब्रम्हगिरी
"ब्रम्हगिरी" ह्याला त्र्यंबकगड असेही म्हणतात....किल्लावर जाणारी वाट हि त्र्यंबकेश्वर गावातुनच जाते....आमची बस असल्याने आम्हांला वळसा घालून जावे लागले....बस पार्क करुन समोरच दिसणा-या पाय-या वरुन चालायला सुरुवात केली....पाय-या चढत असताना बरोबर चालणा-या काही लोकांन कडुन त्या किल्या बद्दल ची माहिती समजावुन घेत होतो...ह्या किल्ल्याला जस "हिंदवी स्वराज्याच्या" इतिहासात स्थान आहे तसच ह्या किल्ल्याला "आध्यात्मिक" स्थान सुद्धा आहे..."ब्रम्हगिरी" ह्या नावाची सुध्दा आख्यायिका इथल्या स्थानिक लोकांन कडुन सांगितली जाते...."एकदा विष्णू ब्रम्हदेवाला म्हणाले की, पुष्कळ तप केले परंतु अजूनही शिवाचे ज्ञान मला झाले नाही तेव्हा त्या दोघांनी ठरविले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध लावायचा. पण पुष्कळ शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांनी केतकी आणि पुष्प यांची खोटी साक्ष उभी केली आणि ब्रम्हाने सांगितले की मी महादेवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. शिवाने कृद्ध होऊन गायीलाही शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला की, भूतलावर पर्वत होऊन राहशील. रागाचा हा आवेग ओसरल्यावर त्याने शाप मागे घेतला आणि त्याने भूतलावर पर्वताचे रूप घेतले आणि त्याचे नाव ब्रम्हगिरी ठेवले"
दुसरी आख्यायिका अशी........गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी गौतम ऋषींनी केली, पण गंगा मात्र राजी नव्हती तेव्हा शंकराने आपल्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. गौतमांचं गोहत्येचं पाप निवारण करून गाईलाही सजीव केलं म्हणून तिचं नाव पडलं गोदावरी.
आणि "हिंदवी स्वराज्याच्या" इतिहासात हा किल्ला पुर्वी महाराष्ट्रातुन गुजरातमध्ये जाणा-या वाटेवर निगराणी ठेवण्यासाठी संरक्षण करण्यासाठी वापरला जायचा अस सांगितले जाते...
हि माहिती घेत असताना मी पाय-या चढतही होतो...खर तर मला पाय-या चढायचा कंटाळा येतो...तसाच आता ही आलाच होता...
पाय-या पेक्षा मला पाय-या नसलेल्या वाटेवर चालायला नेहमीच आवडत...कारण सामान्य वाटेपेक्षा पायरी असलेल्या वाटेवर ऊर्जा जास्त खर्च होते असा माझा समज.... खर-खोट याची शहानिशा करण्याचा घाट आजतागायत घातलेला नाही...चढत असताना मात्र एका अनाहुत पाहुण्यांनी जवळ जवळ "वाटच" लावली.WHOLE वावर IS OUR या अविर्भावात वावरणारी हि मंडळी माकडं! होती आमच्या यत्र-तत्र-सर्वत्र असणारी माकडं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आम्हांला त्यांच्या तालावर नाचवत होती...आमच्या टोप्या,मुलींच्या पर्स,मोबाईलस् खेचण्यासाठी ती आतुरलेली आणि आम्ही ती वाचवण्यासाठी धडपडत होतो...एक ठिकाणी आमच्या फिलोमिनाचा जॅकेट एका माकडाने धरलं,धरल्याबरोबर फिलोमिना घाबरली.हिच घाबरण्याची पध्दत म्हणजे आम्हाला काळजी कमी आणि हसायलाच जास्त येतं...हिच्या नावात जसा वेगळेपणा आहे...तसा तो तिच्या वावरण्यात पण फिलोमिना(THE MAGICAL LOVE) हा तिच्या नावातला अर्थ प्रत्यक्ष आयुष्यात सुध्दा दिसतो तर अस!हे आमचं ध्यान नंतर मात्र त्याच्या वर हात उगारल्यावर त्याने जॅकेट सोडल...ह्या आमच्या "हुतुहुतुच्या खेळात" मध्येच,आम्ही वर चढत होतो.वर चढुन गेल्यावर सरबत,ताक,बिस्कीटस् ची विक्री करणा-यांची दुकान चालु झाली....त्यातील एका दुकावरील वाक्याने माझ्या लक्ष वेधल ते वाक्य अस होत "पियो शरबत,चढो परबत" हे फारच गंमतीशीर वाटल,हसु सुध्दा आलं त्या वाक्याने...
किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. पठारावर पोहोचल्यावर पायर्यांच्या वाटेने समोरच्या उंचवटयाच्या दिशेने चालत गेलो तर मध्येच एक वाट डावीकडे गेलेली होती तिथे एक गुहा होती,ह्याला ‘सिद्धगुंफे’ म्हणतात. या ठिकाणी कडयात खोदलेली एक गुहा सुध्दा आढळली त्याची निटशी माहिती उपलब्ध नव्हती पुढे थोडयाच वेळात पायर्यांची वाट दुभंगलेली दिसली. प्रथम उजवीकडच्या वाटेला वळुन आम्ही १०-१५ मिनिटांतच आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. या ठिकाणीच गौतमी गंगेचा ऊर्फ गोदावरी नदीच्या उगमाचे स्थान आहे. अस कळालं हे सर्व पाहून १० मिनिटांतच आम्ही दुसर्या मंदिराजवळ पोहोचलो. याच ठिकाणी आख्यायिकेत सांगितल्या प्रमाणे शंकराने आपल्या जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली,ह्याच पठारावरुन समोर दिसणारा हरीहर,अंजनेरी, मनोहरी सह्याद्री पाहुन परतीच्या वाटेला लागलो.....खाली उतरायला सुरुवात केली....खाली उतरायला आम्हांला दुपारी. ३.००- ३.१५ वाजले होते...एका सौंदर्याच रुप मनात...कोरल गेलेल होत...आता हे प्रतिक्षा होती ती...दुस-या सौंदर्याची....
विविध वाटेवरचा🌏संगम....नयनरम्य हरीहरच्या पायथ्याशी.
ब्रम्हगिरी उतरुन...हरिहरच्या वाटेला लागलो...हरीहर हा किल्ला त्र्यंबकेश्वरपासुन २० किलोमीटर अंतरावर...अगदीच अचुक सांगायचं झाल्यास नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे.
पायथ्याच गाव "निरगुपाडा",हे गाव डोंगरांच्या मध्ये वसलेल गावातुन वर आकाशाकडे पाहिल्यावर डोंगरांच्या भिंतीच दिसतात....पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.....जेव्हा पोहचलो तेव्हा दिवस सरत आलेला होता....किल्ल्याकडे पाहिल्यावर एकक्षण वाटुन गेल कि आताच किल्ला सर करावा...मंदार,अश्विन ने माझ्या भावनांना आवर घातला....मग मात्र गाव पुर्ण न्याहाळायच...ठरवलं,
हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी घरं...गवताच्या पेंड्यांचे मचाण...दिवस मावळायला लागल्यावर शेतकरी बाया-बापडी,गाई-म्हशींची आणि त्यांना राखणा-या पोरांची आपापल्या घराकडे परतायची लगबग... असंच चालत त्या वस्तीपासुन थोडस पण लांब अंतरावर गेलो आणि परत त्या गावाकडे पाहिल्यावर एक विहंगम दृश्य पाहिलं "विहंगम" हाच शब्द मी वापरेन कारण ते कदाचित छायाचित्रकाराच्या नजरेला सुध्दा फिके करेल ...इतकं! माझ्या हातात कॅमेरा असुन सुद्धा मला ते दृश्य काढण्याच सुचलं नाही किंवा मी तसा प्रयत्न केला नाही कारण मी पाहिलेल्या त्या दृश्याचा,मला एकट्याला साक्षीदार व्हायच होत...घर कौलारूच.....आणि छोटी सुध्दा....पण ह्या सगळ्यांचा संच केल्यावर मला महाभारत किंवा रामायणातील गाव आठवायला लागली...कौलारु घरांच्या मधुन एक वळण घेऊन गेलेला कच्चा रस्ता,त्या रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक .....बंदच! पण त्या गावच्या सौंदर्यात भर घालणारा होता...कदाचित तो ट्रक नसता तर "बासुंदी मध्ये चारोळे" नसल्याची जाणिव झाली असती ...त्या गावातील हवा उष्णतेची रजई सोडुन ...हलकिशी मऊशार थंड शाल पांघरायला लागलेली होती..हि वेळ पुर्वीपासुन आपल्या कडे 'कातरवेळ' म्हणुन ओळखली जाते...पण त्यावेळी मात्र हि कातरवेळेची वेळ आहे हा विचार मनाला शिवलासुद्धा नाही....असोत माझ्या "विहंगम" दृश्य पाहुन आल्यावर पाहिलं तर मंदार,अश्विन,अभिने किराणा सामान देऊन जेवण बनवण्याची तयारी सुरू केली होती....जेवण अर्थात त्या गावातल्या लोकांनीच बनवायला घेतलेलं...आम्हाला हातच लावुन देत नव्हते...जेवणाचा बेत..भाकरी,रस्सा भाजी,भात असा ठरलेला होता...
एकिकडे जेवण बनवण चालु असताना...दुसरीकडे आमच्या संस्थेची प्रथा पाळत होतो....प्रथा! एकमेकांशी परीचय करुन घेण्याची....आम्ही सगळेच कुठे ना कुठे अन्य क्षेत्रात कार्यरत असतो..काही जण नविन असतात आणि सर्वात महत्वाचे आपण सगळे एकाच ध्यासाचे प्रवासी असतो... कोण काय करत हे कळायला हव ना!....
पण ह्या मुळेच रवि,शरयु,संपदा,श्रीराम ह्यांच्यातील सुप्त गुणांची कल्पना मला आणि पर्यायाने संपुर्ण ग्रुपला झाली....रविच्या अफलातून कविता पहिल्या पावसातील तुषार जसे शरीराला सुखावतात तसे ह्याचे शब्द हृदयाला भिडतात... शरयु,संपदाच गाणं,नवखं असलं तरी मला सवाई गंधर्व महोत्सवाच्या दारात नेऊन सोडणारं ...श्रीरामचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा नसांनसात चेतना जागवणारा....
लेखाच्या सुरुवातीला सौरभ,रविंद्र,फिलोमिना,संपदा,गौरव, शरयु,माझे जिजु,अक्षय,वैभव ह्यांची ओळख करुन देताना हि सगळी मंडळी तुफान राडा घालणारी "कार्टी" म्हणालो.... प्रत्येकाची राडा घालण्याची पद्धत वेगवेगळी..... सांधण व्हॅलीनंतर मंदारबरोबर, अश्विन,तेजस,अभि,अमु,कस्तु ह्यांच्यासाथीने लिहिण्याचा गाभा तयार झालेला होता.आणि..मला शब्दांच्या दुनियेत अडकवणारी,मी लेख लिहावा हे डोक्यात खुळ भरवणारी हिच ती "कार्टी" .....अशी झालेली "मैत्री".वास्तविक माझी लिहिण्याची सुप्त इच्छा ह्यांच्या निमित्ताने पुर्ण झाली...
ह्या सगळ्या कार्यक्रमानंतर मनाचं भोजन "दुर्वांकुर"च्या चवी इतकच बहारदार झालेल होतं .......आता शारीरिक भुकेची वेळ होती...आम्ही सर्वजण....जेवायला बसलो...मी मात्र स्वतंत्र ताट न घेता प्रत्येकाच्या ताटातला एक घास खात होतो...एक-एक घासामध्ये माझ पोट केव्हाच भरल,आता खाण अशक्य होत...हात धुवून....रात्रीच्या थंडगार वा-यात झोपायची तयारी करायला लागलो...मग हळुहळू सर्वचजण आले ठरल्याप्रमाणे मुलींसाठी एका घरात झोपायची व्यवस्था केली होती आम्ही मुल मात्र बाहेरच झोपायच ठरल.....दुस-या दिवशीच्या संपुर्ण नियोजनाची एक छोटी बैठक घेऊन आम्ही पण झोपायला गेलो...१४ तारखेचा दिवस संपलेला होता...सुर्यनारायणाच्या दर्शनाची १५ तारीख,रविवार आणि मी, आम्ही तिघेही वाट पहात होतो....
हृदयस्पर्शी हरीहर...

कोंबड्याने बांग देण्या आधीच माझी सकाळ झाली...कारण पहाटेच्या वा-याने त्याचा प्रभाव पाडायला सुरुवात केली...वाहणारा वारा झोंबायला लागला होता...त्यात मी सुरुवातीला झोपल्यामुळे मला जास्तच झोंबत होता ....मी उठलो...माझ्याबरोबरीने जीजु (स्नेहलराव) पण उठले...मग मंदार.
मग जीजुंनी रात्री पेटवलेल्या शेकोटी जवळ जाऊन निखा-यांना पेटवण्याचा प्रयत्न करत होते..कारण थंडी वाजत होती..मी आणि मंदार चहाची तयारी करायला लागलो....चहा तयार करायचं काँट्रॅक्ट हे माझ्या नावावर अलिखित करुन ठेवलय....मलाच चहा जास्त लागतो...
जीजुंनी "प्रयत्नांती परमेश्वर" हे वाक्य सार्थ ठरवत एकदाची चुल cum शेकोटी पेटवलीच...त्यांच्या कष्टांवर "कळस" म्हणुन मी चहाच पातेल ठेवलं,चहाने तयार व्हायला जवळपास अर्धा तास घेतला...ह्या वेळात बाकिची मंडळी उठायला सुरुवात झाली..जो उठतोय तो शेकोटी जवळ येऊन बसतोय... उठतोय तो शेकोटी जवळ येऊन बसतोय..."फुकट ते पौष्टिक" लेकाचे सगळे...
असोत पण मी मात्र ह्या सगळ्यांना पिटाळायच्या पाठीमागे लागलो होतो.."सगळ्यांना आपापले "प्रातःविधी" उरकून या" बजावत होतो...
कटकट करुन का होईना पण जात होते...जसे येतील तसे "चहा घ्या" लगेच सर्वांनी चहा घ्यायला सुरूवात केली... ह्या चहापानाचा कार्यक्रम उरकुन सर्व जण आम्ही हरीहर चढण्यासाठी तयार झालो होतो...
काही जुजबी सुचना देऊन किल्ल्याच्या दिशेने चालायला लागलो...
गावापासुन काही अंतरानंतर उजव्या हाताने चालत गेल्यावर वर हरीहर किल्ल्याचा खडा कातळ दिसतो...दिसताना तो आयताकृती भासतो...
अर्धा-पाऊण तास पायवाटेने चढुन गेल्यावर मी छोट्या पठारारवरुन किल्ला न्याहाळत होतो दिसायला अप्रतिम दिसणारा हा किल्ल्याचा खडक,लहान मुलाला आपली प्रिय वस्तू पाहुन त्याच्या ' निरागस आनंदाला भरतं याव' तस मन उसळायला लागलं.
मला किल्ल्याच नेहमीच आकर्षण वाटण्याच कारण त्याच दिसणं,त्याच्यातला रुबाबदार पणा,त्याचा राकटपणा,सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास पहिल्या नजरेच एखाद्या आकर्षक तरुणीने आपल हृदय जिंकाव म्हणजे मग ती गोरी आहे की सावळी हा प्रश्न गौणच,
हृदय जिंकण्याची किमया हरीहरने साधली होती...मग भानावर येऊन इतरांना चढण्यास मदत करायला लागलो...गडाच्या पाय-या ह्या खडकामध्ये कोरलेल्या होत्या म्हणुन सांभाळून चढण गरजेच होतं..चढताना मी,मंदार,अश्विन,तेजस सुचना देतच होतो... वर चढुन गेल्यावर पहिला दरवाजा आणि नंतरची वाट पाहुन मन अजुन प्रेमात पडलं होतं..थोड्याशा विश्रांतीनंतर,सर्वजण वर आल्यावर मग पुढची वाट चालायला लागलो .... वाट! ती तर झुकुन चालावी लागत होती.. १० मीचा ...पट्टा हा ४ फुट उंचीचा आणि २.५० फुट लांबीचा... साहजिकच मला वाकुनच चालावं लागलं...त्यानंतर अजुन एक गंमत किंवा "सोने पे सुहागा" म्हणा,कोरलेल्या पाय-यांच अजुन रुप, आमची एक चुक,एक हलगर्जीपणा .....पृथ्वी ते कैलासवासी होण्याच्या प्रवासाच Non Refundable तिकिट निश्चित! पाय-या निमुळत्या, लागुनच असलेली साधारण ४०० फुट खोल दरी ...या ठिकाणी मात्र माझ्या मेंदूने मनाचा ताबा घेतला...आणि ते मनाला भावणारं रोमहर्षक दृश्य न पाहाता..सगळे व्यवस्थित कसे चढतील ह्यावर लक्ष केंद्रित केल.. आणि आम्ही सर्वजण एका मोकळ्या पठारावर येऊन पोहचलो..
इथे अजिबात मगाच सारखी असुरक्षितता नव्हती विस्तीर्ण पठार होत.आजुबाजुला मोकळी जागा..लांबपर्यंत दिसणारा सह्याद्री,पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा पाहायला मिळाला पण किल्ला चढत असतानाच 'तेथे जाण्याचा मार्ग सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही' असं कळाल्यामुळे परत फिरलो थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर होत. समोरच पाण्याचा मोठा तलाव पाहायला मिळाला,तलावातील पाणी पिण्यास योग्य वाटलं येथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत दिसली. या इमारतीत दोन खोल्या आहेत. या इमारतीमध्ये १० ते १२ जणांना राहता येते. इमारतीच्या एका बाजूला ५ पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. गडाचा घेरा फारच निमुळता असल्याने एक तासात गड फेरी आटोपती घेतली....आणि परत दुपारी उतरायला सुरुवात केली..... गावातच दुपारचे जेवण सांगितल्यामुळे जेवण खालीच करणार होतो...
गड उतरुन आल्यावर....गावातल्या ओढ्यावर (स्वच्छ होताच तो) आम्ही आंघोळी उरकून....जेवायच्या तयारीला लागलो,पिठलं-भात! बेत उत्तमच... झाला होता..जेवणं उरकली.....आतापर्यंत आम्ही जेवढे ट्रेक केले त्या मध्ये एक गोष्ट सारखी आढळली त्या प्रत्येक गावातील लोकांनी कधीही जेवण बनवण्याचे LABOUR CHARGE घेतले नाहीत...किंवा दिसला "बकरा" म्हणुन काप अस कधीच केल नाही...कधीकधी आम्हांला त्यांची ही "श्रीमंती"आत्मसात करता येईल का? अस वाटल्या वाचुन राहावल नाही...ह्या सगळ्या विचारमंथनानंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो.....
निघाल्यानंतर...सर्वजण गाडी मध्ये मजा,मस्तीत गुंग होते. पण मी,अभिजीत,अश्विन,मंदार,तेजस आमच्या आगामी मोहिमे बद्दल चर्चा करत होतो....ह्या चर्चे दरम्यान रात्रीच्या जेवणासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचलो... "हाॅटेल श्री हरी पांडुरग,आळेफाटा " ह्या हाॅटेल मधल्या जेवणाची चव मात्र अप्रतिम होती....सुस्ती येई तोपर्यंत आडवा हात मारला जेवणावर...
आणि तळेगावी येऊन पोहोचली....
धन्यवाद....

"सौंदर्य" कस असावं?तर त्याचा मर्म आणि धर्म दोन्ही मुळचेच सुंदर असणं किंवा सर्व स्तरावर उच्च कोटीची सुंदरता....हिच त्याची व्याख्या,
"हरीहर" आणि "ब्रम्हगिरी" ह्यांना चपखल बसते....
आमच्या "सांधण व्हॅलीच्या" ट्रेक नंतर मे महिन्यातल्या आमच्या पुढचा "रांगणा किल्ल्याचा" ट्रेक कमी संख्येअभावी रद्द करावा लागला आणि ह्या नंतर,ट्रेक कुठे न्हायचा?असा प्रश्न उदभवलाच नाही कारण मंदार भावे ते काम १००% चोख करतो
आणि त्यान सांगितले "हरीहर" आणि "ब्रम्हगिरी" करु.....नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हे किल्ले...ठरलं मग! मागचा अनुभव (सांधणव्हॅली चा) लक्षात घेता पायलट ट्रेक न करता कुठलाही किल्ला निश्चित करायचा नाही ही काळ्या दगडावर पांढरी रेघच मारुन ठेवली!
पुढे कोणी पायलट ट्रेक करावा? ह्या चर्चेचा शेवट तेजा(तेजस गुरव) आणि अॅशले(अश्विन गंगाणी) ह्यांचा नावावर येऊन थांबला तेजस,अॅशले आणि तेजसचा रोहन नावाचा मित्र हे पायलट ट्रेकला गेले.हे जाऊन आल्यावर किल्ला "मस्त,छान,चांगला,सुंदर" ह्या विशेषणांनी मनातली उत्कंठा वाढायला लागली पण ह्या उत्कंठे बरोबर आलेल जवाबदारीच दडपण ,१५ वर्षांपुर्वी सुरु झालेला"मैत्री संस्था"बरोबरचा आमचा प्रवास आता मी,मंदार,तेजस,अश्विनसाठी एक नविन भुमिका घेऊन आलेला होता हि भुमिका व्हॅलीच्या ट्रेक नंतर अजुनच परीपक्व झालेली......
जवाबदारी आली की त्याच दडपण येण हे स्वाभाविकच!,पण निभावणं? म्हणजे नुसती तारेवरची कसरत नव्हे तर वादळात हेलकावे खाणा-या गलबताला सावरण्या-या कप्तानासारखी अवस्था....असोत आमच्या पायलट ट्रेक नंतर पुर्ण नियोजनाची वेळ आली १३,१४,१५ नोव्हेंबर तारीख ठरली.
नियोजनात सर्वात महत्वाचा मुद्दा हा येणारी संख्या! ३५ ही संख्या निश्चित केल्यावर ती कुठुन आणि कसे येणार? यावर एक उपाय आम्ही शोधला,उपाय जुनाच होता पण तो नव्याने पण प्रभावीपणे राबवायचा अस ठरलं.
आपल्या परीचयाच्या सगळ्यांना निरोप पोहचवावा त्यातुन संख्या वाढवावी हाच उपाय कामी आला आणि जुन्या लोकांमध्ये काही नविन मंडळी आमच्या ताफ्यात दाखल झाली,तेजस कडुन गौरव,शरयु,संपदा इ.,अश्विन कडुन सौरभ,रवि,फिलोमीना ही मंडळी माझ्या कडुन माझे जिजु स्नेहलराव,भाचा सुमित,त्यांचा चुलत भाऊ अक्षय,वैभव ही, मंदार कडुन वैष्णवी इ.....
हि सगळी मंडळी अतरंगी कार्टी,अवलि,उनाड,राडा घालणारी प्रत्येका मध्ये काही ना कौशल्य,"कार्टी"हाच शब्द Perfect आहे असच वाटणारी हि मंडळी....
आमच्या नियोजनाचा अन्य दुसरा महत्वाचा घटक सामानाची जुळवाजुळव आणि किराणा आणणे,भाजी आणणे,पातेली घेणे हे सगळं जमवता जमवता दमछाक व्हायची पातेली,कालथा,डाव,सु-या स्वतःच्या नसल्याने ते भाड्याने आणव्या लागल्या भाज्या आणि किराणा मंदारच्या घरी पोहचला.....
सर्व काम आधीच उरकून १३ तारखेला मी,जिजु,सुमीत,अक्षय, वैभव मंदारच्या घरी दाखल झालो रात्री सगळी जमलो पण नेहमीप्रमाणे ह्या वेळला सुध्दा late latif होतीच, नेहमीप्रमाणे बस याही वेळ ला आम्ही रात्री १२ च्या शुभ मुहूर्तावरच हलवली बस तळेगाव-चाकण-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेरला आली,संगमनेर मध्ये वाटेत एका हाॅटेल मध्ये फक्कड चहा आणि दुधाचा बेत रंगला चहा झाल्यावर बस निघाली ती थेट त्र्यंबकेश्वरला येऊन थांबली,आम्ही थांबलो त्यावेळी साधारण ५.३०,६.०० वाजले होते त्र्यंबकेश्वर! हे बारा ज्योर्तिलिंगा पैकी एक असलेल ज्योर्तिलिंग वातावरण सुध्दा तसच 'धार्मिक' त्र्यंबकेश्वरमध्ये आंघोळ आणि नाश्ता व बाकी नैसर्गिक विधींसाठी म्हणुन श्री गजानन महाराज ट्रस्टची निवड केली होती... त्र्यंबकेश्वरात ट्रस्टची मोठी प्रशस्त इमारत,अन्नछत्र मंडळ,श्री.गजानन महाराजांच संगमरवरी मंदिर इ खुप सुंदर वसवलेल आहे हे ट्रस्ट भक्तांसाठी लाॅज पण उपलब्ध करुन देतात त्यांनीच आम्हांला एक मोठा हाॅल उपलब्ध करुन दिला हा हाॅल जरा अपेक्षेपेक्षा मोठाच होता सगळ्यांना आवरायला सांगुन आम्ही बाकी नाश्ताची व्यवस्था पाहण्यासाठीगेलो...व्यवस्था खुप सोपी होती...पैसे देऊन कुपन्स घ्यायचे,फक्त सेल्फ सर्व्हिस मुळे गर्दी तेवढी होते पण आम्ही लवकर पोहोचल्यामुळे तोही प्रश्न नव्हता सगळ्यांना जबरदस्तीने आवरायला लावुन न्याहरीसाठी पिटाळले कारण इथे अन्नछत्र मंडळाच्या काऊंटरच्या वेळा निश्चित आहेत ठरलेल्या वेळेतच न्याहरी आणि जेवण मिळते न्याहरी स.८.०० ते ९.३०...व जेवण दुपारी १२.०० ते २.०० यावेळेतच मिळतं न्याहरी करायला बसल्यावर उपमा,पोहे,साबुदाणा खिचडी असे पदार्थ होते ह्यांची किंमत ११ रु. प्रत्येकी एक प्लेट इतकी माफक मला खर आश्चर्य तर पुढे वाटलं कारण मी खात असलेला उपमा..हा चक्क! साजुक तुपात बनवला होता त्याची चव अप्रतिमऽऽऽऽऽऽ लागत होती मुळचा मी खाण्यात तरबेज असल्या कारणाने 'मला आवडला' ह्याचच जास्त आश्चर्य वाटलं पण खरच राव! उपमा "दर्जा"च होता न्याहरी झाल्यावर आणि नंतर त्या आवडलेल्या जागेचे,मंदिराचे फोटोज घेऊन आम्ही आमच्या या मोहीमतल्या पहिल्या किल्ल्याच्या "ब्रम्हगिरीच्या" दिशेने प्रयाण केले.
मनमोहक ब्रम्हगिरी
"ब्रम्हगिरी" ह्याला त्र्यंबकगड असेही म्हणतात....किल्लावर जाणारी वाट हि त्र्यंबकेश्वर गावातुनच जाते....आमची बस असल्याने आम्हांला वळसा घालून जावे लागले....बस पार्क करुन समोरच दिसणा-या पाय-या वरुन चालायला सुरुवात केली....पाय-या चढत असताना बरोबर चालणा-या काही लोकांन कडुन त्या किल्या बद्दल ची माहिती समजावुन घेत होतो...ह्या किल्ल्याला जस "हिंदवी स्वराज्याच्या" इतिहासात स्थान आहे तसच ह्या किल्ल्याला "आध्यात्मिक" स्थान सुद्धा आहे..."ब्रम्हगिरी" ह्या नावाची सुध्दा आख्यायिका इथल्या स्थानिक लोकांन कडुन सांगितली जाते...."एकदा विष्णू ब्रम्हदेवाला म्हणाले की, पुष्कळ तप केले परंतु अजूनही शिवाचे ज्ञान मला झाले नाही तेव्हा त्या दोघांनी ठरविले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध लावायचा. पण पुष्कळ शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांनी केतकी आणि पुष्प यांची खोटी साक्ष उभी केली आणि ब्रम्हाने सांगितले की मी महादेवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. शिवाने कृद्ध होऊन गायीलाही शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला की, भूतलावर पर्वत होऊन राहशील. रागाचा हा आवेग ओसरल्यावर त्याने शाप मागे घेतला आणि त्याने भूतलावर पर्वताचे रूप घेतले आणि त्याचे नाव ब्रम्हगिरी ठेवले"
दुसरी आख्यायिका अशी........गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी गौतम ऋषींनी केली, पण गंगा मात्र राजी नव्हती तेव्हा शंकराने आपल्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. गौतमांचं गोहत्येचं पाप निवारण करून गाईलाही सजीव केलं म्हणून तिचं नाव पडलं गोदावरी.
आणि "हिंदवी स्वराज्याच्या" इतिहासात हा किल्ला पुर्वी महाराष्ट्रातुन गुजरातमध्ये जाणा-या वाटेवर निगराणी ठेवण्यासाठी संरक्षण करण्यासाठी वापरला जायचा अस सांगितले जाते...
हि माहिती घेत असताना मी पाय-या चढतही होतो...खर तर मला पाय-या चढायचा कंटाळा येतो...तसाच आता ही आलाच होता...
पाय-या पेक्षा मला पाय-या नसलेल्या वाटेवर चालायला नेहमीच आवडत...कारण सामान्य वाटेपेक्षा पायरी असलेल्या वाटेवर ऊर्जा जास्त खर्च होते असा माझा समज.... खर-खोट याची शहानिशा करण्याचा घाट आजतागायत घातलेला नाही...चढत असताना मात्र एका अनाहुत पाहुण्यांनी जवळ जवळ "वाटच" लावली.WHOLE वावर IS OUR या अविर्भावात वावरणारी हि मंडळी माकडं! होती आमच्या यत्र-तत्र-सर्वत्र असणारी माकडं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आम्हांला त्यांच्या तालावर नाचवत होती...आमच्या टोप्या,मुलींच्या पर्स,मोबाईलस् खेचण्यासाठी ती आतुरलेली आणि आम्ही ती वाचवण्यासाठी धडपडत होतो...एक ठिकाणी आमच्या फिलोमिनाचा जॅकेट एका माकडाने धरलं,धरल्याबरोबर फिलोमिना घाबरली.हिच घाबरण्याची पध्दत म्हणजे आम्हाला काळजी कमी आणि हसायलाच जास्त येतं...हिच्या नावात जसा वेगळेपणा आहे...तसा तो तिच्या वावरण्यात पण फिलोमिना(THE MAGICAL LOVE) हा तिच्या नावातला अर्थ प्रत्यक्ष आयुष्यात सुध्दा दिसतो तर अस!हे आमचं ध्यान नंतर मात्र त्याच्या वर हात उगारल्यावर त्याने जॅकेट सोडल...ह्या आमच्या "हुतुहुतुच्या खेळात" मध्येच,आम्ही वर चढत होतो.वर चढुन गेल्यावर सरबत,ताक,बिस्कीटस् ची विक्री करणा-यांची दुकान चालु झाली....त्यातील एका दुकावरील वाक्याने माझ्या लक्ष वेधल ते वाक्य अस होत "पियो शरबत,चढो परबत" हे फारच गंमतीशीर वाटल,हसु सुध्दा आलं त्या वाक्याने...
किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. पठारावर पोहोचल्यावर पायर्यांच्या वाटेने समोरच्या उंचवटयाच्या दिशेने चालत गेलो तर मध्येच एक वाट डावीकडे गेलेली होती तिथे एक गुहा होती,ह्याला ‘सिद्धगुंफे’ म्हणतात. या ठिकाणी कडयात खोदलेली एक गुहा सुध्दा आढळली त्याची निटशी माहिती उपलब्ध नव्हती पुढे थोडयाच वेळात पायर्यांची वाट दुभंगलेली दिसली. प्रथम उजवीकडच्या वाटेला वळुन आम्ही १०-१५ मिनिटांतच आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. या ठिकाणीच गौतमी गंगेचा ऊर्फ गोदावरी नदीच्या उगमाचे स्थान आहे. अस कळालं हे सर्व पाहून १० मिनिटांतच आम्ही दुसर्या मंदिराजवळ पोहोचलो. याच ठिकाणी आख्यायिकेत सांगितल्या प्रमाणे शंकराने आपल्या जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली,ह्याच पठारावरुन समोर दिसणारा हरीहर,अंजनेरी, मनोहरी सह्याद्री पाहुन परतीच्या वाटेला लागलो.....खाली उतरायला सुरुवात केली....खाली उतरायला आम्हांला दुपारी. ३.००- ३.१५ वाजले होते...एका सौंदर्याच रुप मनात...कोरल गेलेल होत...आता हे प्रतिक्षा होती ती...दुस-या सौंदर्याची....
विविध वाटेवरचा🌏संगम....नयनरम्य हरीहरच्या पायथ्याशी.
ब्रम्हगिरी उतरुन...हरिहरच्या वाटेला लागलो...हरीहर हा किल्ला त्र्यंबकेश्वरपासुन २० किलोमीटर अंतरावर...अगदीच अचुक सांगायचं झाल्यास नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे.
पायथ्याच गाव "निरगुपाडा",हे गाव डोंगरांच्या मध्ये वसलेल गावातुन वर आकाशाकडे पाहिल्यावर डोंगरांच्या भिंतीच दिसतात....पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.....जेव्हा पोहचलो तेव्हा दिवस सरत आलेला होता....किल्ल्याकडे पाहिल्यावर एकक्षण वाटुन गेल कि आताच किल्ला सर करावा...मंदार,अश्विन ने माझ्या भावनांना आवर घातला....मग मात्र गाव पुर्ण न्याहाळायच...ठरवलं,
हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी घरं...गवताच्या पेंड्यांचे मचाण...दिवस मावळायला लागल्यावर शेतकरी बाया-बापडी,गाई-म्हशींची आणि त्यांना राखणा-या पोरांची आपापल्या घराकडे परतायची लगबग... असंच चालत त्या वस्तीपासुन थोडस पण लांब अंतरावर गेलो आणि परत त्या गावाकडे पाहिल्यावर एक विहंगम दृश्य पाहिलं "विहंगम" हाच शब्द मी वापरेन कारण ते कदाचित छायाचित्रकाराच्या नजरेला सुध्दा फिके करेल ...इतकं! माझ्या हातात कॅमेरा असुन सुद्धा मला ते दृश्य काढण्याच सुचलं नाही किंवा मी तसा प्रयत्न केला नाही कारण मी पाहिलेल्या त्या दृश्याचा,मला एकट्याला साक्षीदार व्हायच होत...घर कौलारूच.....आणि छोटी सुध्दा....पण ह्या सगळ्यांचा संच केल्यावर मला महाभारत किंवा रामायणातील गाव आठवायला लागली...कौलारु घरांच्या मधुन एक वळण घेऊन गेलेला कच्चा रस्ता,त्या रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक .....बंदच! पण त्या गावच्या सौंदर्यात भर घालणारा होता...कदाचित तो ट्रक नसता तर "बासुंदी मध्ये चारोळे" नसल्याची जाणिव झाली असती ...त्या गावातील हवा उष्णतेची रजई सोडुन ...हलकिशी मऊशार थंड शाल पांघरायला लागलेली होती..हि वेळ पुर्वीपासुन आपल्या कडे 'कातरवेळ' म्हणुन ओळखली जाते...पण त्यावेळी मात्र हि कातरवेळेची वेळ आहे हा विचार मनाला शिवलासुद्धा नाही....असोत माझ्या "विहंगम" दृश्य पाहुन आल्यावर पाहिलं तर मंदार,अश्विन,अभिने किराणा सामान देऊन जेवण बनवण्याची तयारी सुरू केली होती....जेवण अर्थात त्या गावातल्या लोकांनीच बनवायला घेतलेलं...आम्हाला हातच लावुन देत नव्हते...जेवणाचा बेत..भाकरी,रस्सा भाजी,भात असा ठरलेला होता...
एकिकडे जेवण बनवण चालु असताना...दुसरीकडे आमच्या संस्थेची प्रथा पाळत होतो....प्रथा! एकमेकांशी परीचय करुन घेण्याची....आम्ही सगळेच कुठे ना कुठे अन्य क्षेत्रात कार्यरत असतो..काही जण नविन असतात आणि सर्वात महत्वाचे आपण सगळे एकाच ध्यासाचे प्रवासी असतो... कोण काय करत हे कळायला हव ना!....
पण ह्या मुळेच रवि,शरयु,संपदा,श्रीराम ह्यांच्यातील सुप्त गुणांची कल्पना मला आणि पर्यायाने संपुर्ण ग्रुपला झाली....रविच्या अफलातून कविता पहिल्या पावसातील तुषार जसे शरीराला सुखावतात तसे ह्याचे शब्द हृदयाला भिडतात... शरयु,संपदाच गाणं,नवखं असलं तरी मला सवाई गंधर्व महोत्सवाच्या दारात नेऊन सोडणारं ...श्रीरामचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा नसांनसात चेतना जागवणारा....
लेखाच्या सुरुवातीला सौरभ,रविंद्र,फिलोमिना,संपदा,गौरव, शरयु,माझे जिजु,अक्षय,वैभव ह्यांची ओळख करुन देताना हि सगळी मंडळी तुफान राडा घालणारी "कार्टी" म्हणालो.... प्रत्येकाची राडा घालण्याची पद्धत वेगवेगळी..... सांधण व्हॅलीनंतर मंदारबरोबर, अश्विन,तेजस,अभि,अमु,कस्तु ह्यांच्यासाथीने लिहिण्याचा गाभा तयार झालेला होता.आणि..मला शब्दांच्या दुनियेत अडकवणारी,मी लेख लिहावा हे डोक्यात खुळ भरवणारी हिच ती "कार्टी" .....अशी झालेली "मैत्री".वास्तविक माझी लिहिण्याची सुप्त इच्छा ह्यांच्या निमित्ताने पुर्ण झाली...
ह्या सगळ्या कार्यक्रमानंतर मनाचं भोजन "दुर्वांकुर"च्या चवी इतकच बहारदार झालेल होतं .......आता शारीरिक भुकेची वेळ होती...आम्ही सर्वजण....जेवायला बसलो...मी मात्र स्वतंत्र ताट न घेता प्रत्येकाच्या ताटातला एक घास खात होतो...एक-एक घासामध्ये माझ पोट केव्हाच भरल,आता खाण अशक्य होत...हात धुवून....रात्रीच्या थंडगार वा-यात झोपायची तयारी करायला लागलो...मग हळुहळू सर्वचजण आले ठरल्याप्रमाणे मुलींसाठी एका घरात झोपायची व्यवस्था केली होती आम्ही मुल मात्र बाहेरच झोपायच ठरल.....दुस-या दिवशीच्या संपुर्ण नियोजनाची एक छोटी बैठक घेऊन आम्ही पण झोपायला गेलो...१४ तारखेचा दिवस संपलेला होता...सुर्यनारायणाच्या दर्शनाची १५ तारीख,रविवार आणि मी, आम्ही तिघेही वाट पहात होतो....
हृदयस्पर्शी हरीहर...

कोंबड्याने बांग देण्या आधीच माझी सकाळ झाली...कारण पहाटेच्या वा-याने त्याचा प्रभाव पाडायला सुरुवात केली...वाहणारा वारा झोंबायला लागला होता...त्यात मी सुरुवातीला झोपल्यामुळे मला जास्तच झोंबत होता ....मी उठलो...माझ्याबरोबरीने जीजु (स्नेहलराव) पण उठले...मग मंदार.
मग जीजुंनी रात्री पेटवलेल्या शेकोटी जवळ जाऊन निखा-यांना पेटवण्याचा प्रयत्न करत होते..कारण थंडी वाजत होती..मी आणि मंदार चहाची तयारी करायला लागलो....चहा तयार करायचं काँट्रॅक्ट हे माझ्या नावावर अलिखित करुन ठेवलय....मलाच चहा जास्त लागतो...
जीजुंनी "प्रयत्नांती परमेश्वर" हे वाक्य सार्थ ठरवत एकदाची चुल cum शेकोटी पेटवलीच...त्यांच्या कष्टांवर "कळस" म्हणुन मी चहाच पातेल ठेवलं,चहाने तयार व्हायला जवळपास अर्धा तास घेतला...ह्या वेळात बाकिची मंडळी उठायला सुरुवात झाली..जो उठतोय तो शेकोटी जवळ येऊन बसतोय... उठतोय तो शेकोटी जवळ येऊन बसतोय..."फुकट ते पौष्टिक" लेकाचे सगळे...
असोत पण मी मात्र ह्या सगळ्यांना पिटाळायच्या पाठीमागे लागलो होतो.."सगळ्यांना आपापले "प्रातःविधी" उरकून या" बजावत होतो...
कटकट करुन का होईना पण जात होते...जसे येतील तसे "चहा घ्या" लगेच सर्वांनी चहा घ्यायला सुरूवात केली... ह्या चहापानाचा कार्यक्रम उरकुन सर्व जण आम्ही हरीहर चढण्यासाठी तयार झालो होतो...
काही जुजबी सुचना देऊन किल्ल्याच्या दिशेने चालायला लागलो...
गावापासुन काही अंतरानंतर उजव्या हाताने चालत गेल्यावर वर हरीहर किल्ल्याचा खडा कातळ दिसतो...दिसताना तो आयताकृती भासतो...अर्धा-पाऊण तास पायवाटेने चढुन गेल्यावर मी छोट्या पठारारवरुन किल्ला न्याहाळत होतो दिसायला अप्रतिम दिसणारा हा किल्ल्याचा खडक,लहान मुलाला आपली प्रिय वस्तू पाहुन त्याच्या ' निरागस आनंदाला भरतं याव' तस मन उसळायला लागलं.

Comments