सांधण व्हॅली 2.0
हो नाही ,हो नाही म्हणता सांधण व्हॅली चा ट्रेक ठरला, शंकाकुशंकानी प्रभावित झालेला हा ट्रेक खऱ्या अर्थाने होतो की नाही ? ह्या टप्यावर येऊन पोहोचला होता...त्याला कारणही तशीच अगदी! पावसामुळे रद्द होणारी लोकं त्यातुन निर्माण झालेलं गोंधळाचे वातावरण, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किती लोक येणार ह्याच मुद्यावर अडकलेली 'गाडी'अखेर 11च्या सुमारास 19 लोकांच्या साथीने 'साम्रद' गावाच्या दिशेने धावायला लागली,मग नारायणगाव येथील चहा,दूध असा ठरलेला शिरस्ता ....पण वाटेत पहाटे 5 पर्यंत पडत असलेला पाऊस,पावसाच्या पडणाऱ्या थेंबांबरोबर मनात सुद्धा भीतीचा चालणारा पाठशिवणीचा खेळ.... हे सगळंच परिस्थितीच्या विरुद्ध होतं... पण 'इरादे हे फौलादी ,हिम्मते हर कदम' ह्या अविर्भावात असलेली आम्ही मंडळी ह्या टप्यावर सुद्धा न खचता जायचंच ! ह्याच निकराने निघालो होतो, आणि 6 च्या सुमारास.. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात प्रवेश करताच सुुर्यानारायणाने आपल्या किरणांच्या रूपाने आम्हाला आमंत्रणच दिलेे मग मात्र आत्मविश्वासाने जी काही 'हनुमान उडी मारली' की हा ट्रेक आपला पुर्ण होणार ह्याची ...