आनंदाची 'शिखर' चढाई (कळसूबाई मोहीम)
कळसूबाई शिखर बद्दल ..... कायमच एक अप्रूप राहिलेलं आहे....मग ते सोशल मीडिया वर प्रसिद्ध झालेले फोटो असतील म्हणूनही असेल किंवा मग महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर ...म्हणून नाहीतर मग त्याला महाराष्ट्राचं माऊंट एव्हरेस्ट म्हणतात म्हणूनही असेल कदाचित , आहे हे...नक्की . गेल्या १६-१७ वर्षाच्या प्रवासात अनेक वाटा पायाखालून गेल्या चांगले बरे वाईट घटनांचे 'पुल' ओलांडले गेले पण कळसूबाई शिखर मात्र कायमच माझ्या पासून ४ पावलं दूर राहिलेलं आणि गेल्या २ वर्षा मध्ये तर निसर्गानेही स्वतःला रिसेट केलं....आणि आम्ही ट्रेकर्स ने सुद्धा स्वतःला... "लॉक" असलेले ट्रेकर्स नव्याने तयारीला लागली....आणि आम्ही पण ! गेली २ वर्ष शांत असलेला "Team Management" चा कट्टा "Whatsapp!" म्हणत... मेसेजेस ने सुरू झाला....किल्ला कोणता? कुठला? हा ..नको....तो किल्ला करू....पासून सुरू झालेल्या चर्चेच्या बैठका ह्या 'कळसूबाई शिखर' नावावर थांबल्या.... माझ्या मनात मात्र ह्या वेळी वेगळच द्वंद सुरू होत...मला कसलीच जबाबदारी नको होती...माझ्या एकंदरीत कामाचा अनुभव...आजवर 'किल्ला प...