रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)
झोपण्याची व्यवस्था बघून झाल्यावर जेवण करून सगळी जण सुस्त झाली होती काहींनी दुपारच्या वेळेत खेळायला सुरुवात केली खेळणं आलं की धिंगाणा.... मस्ती.... ओरडणं आलचं तसचं ते इथे होत होतच मी मात्र ह्या सगळ्यात होतो पण सगळ्यापासून तटस्थ होतो कारण मी टीम लीड करत होतो ह्या भूमिकेत कितीही इच्छा असली तरी तटस्थ राहवच लागत ह्यात अनेक मतांतरे असतील प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते नव्हे तरी असायलाच हवी कारण आपण स्वतः कुठे कमी पडतोय आणि आपल्या मर्यादा काय हेही स्पष्ट होत ...कारण ती जवाबदारी असते आणि ती योग्य पद्धतीने पार पडावी ही प्रामाणिक इच्छा! हा माझा स्वभाव माझ्या मित्रांना सुद्धा माहिती आहे, म्हणूनच ते माझ्या निर्णयाला पाठिंबा देत आलेत आणि आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत चा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत आलोय असो हे झालं माझं मत बाकीच्यांचा दृष्टीकोन कदाचित वेगळा असेल ह्या सगळ्याकडे बघण्याचा, माझं मात्र तटस्थ राहण्याचं कारण खेळण्याच्या ओघात पुढील कार्यक्रमाच नियोजन फसू नये आणि तो वेळ वाया जाऊ नये म्हणून .....खेळणं बंद झाल्यानंतर अर्थात ते बंद करणारा मीच 'हिटलर ऑफ ग्रुप' आणि त...