रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)

झोपण्याची व्यवस्था बघून झाल्यावर जेवण करून सगळी जण सुस्त झाली होती काहींनी दुपारच्या वेळेत खेळायला सुरुवात केली खेळणं आलं की धिंगाणा.... मस्ती.... ओरडणं आलचं तसचं ते इथे होत होतच मी मात्र ह्या सगळ्यात होतो पण सगळ्यापासून तटस्थ होतो कारण मी टीम लीड करत होतो ह्या भूमिकेत कितीही इच्छा असली तरी तटस्थ राहवच लागत ह्यात अनेक मतांतरे असतील प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते नव्हे तरी असायलाच हवी कारण आपण स्वतः कुठे कमी पडतोय आणि आपल्या मर्यादा काय हेही स्पष्ट होत   ...कारण ती जवाबदारी असते आणि ती योग्य पद्धतीने पार पडावी ही प्रामाणिक इच्छा! हा माझा स्वभाव माझ्या मित्रांना सुद्धा माहिती आहे, म्हणूनच ते माझ्या निर्णयाला पाठिंबा देत आलेत आणि आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत चा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत आलोय असो हे झालं माझं मत बाकीच्यांचा दृष्टीकोन कदाचित वेगळा असेल ह्या सगळ्याकडे बघण्याचा, माझं मात्र तटस्थ राहण्याचं कारण खेळण्याच्या ओघात पुढील कार्यक्रमाच नियोजन फसू नये आणि तो वेळ वाया जाऊ नये म्हणून .....खेळणं बंद झाल्यानंतर अर्थात ते बंद करणारा मीच 'हिटलर ऑफ ग्रुप' आणि ते करण्याचं कारण कोकणकडा आम्हा महाभागांची वाट बघत होता.... त्याची ही साद मला जाणवली होती ... 

कोकणकडा:-
कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत… ४५०० फूट अंदाजे असावी  संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे ना तो अवर्णनीयच!इथे "इंद्रव्रज" दिसल्याची सुद्धा नोंद आहे. अस पोपटरावांशी बोलताना कळाल, इंद्रव्रज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. येथील निसर्गसौंदर्यावर लुब्ध होऊन एका तरुणाने या कड्यावरून उडी घेतली त्याच्या नावाची संगमरवरी पाटी येथे आहे.अशी गोष्ट सुद्धा ह्या दरम्यान मला कळाली पण मी ती पाटी काही पहिली नाही...आयुष्यात एकदातरी हा सुर्यास्त पाहवाच 'नही तो जिना बेकार है' आकाशात अंधाराने जागा बळकवायला सुरुवात केली पण आमची हि पोट्टी हलायला तयारच नाही ...कशी होणार म्हणा ते वातावरणच मंत्रमुग्ध करणारं होत....माझाच पाय निघत नव्हता कारण ह्या कोकणकड्या मनात घर केलं होतं ,मी ह्याला रौद्र म्हणावं की रुद्र हाच मनात विचार सुरू शेवटी हा कोकण कडा रुद्र आहे त्याची भीषणता जरी असली रुद्रा प्रमाणे शांत ,आनंद देणार आहे..
पण निघणं भाग होतं रात्र होत होती आणि आम्ही निघालो..... परत आपल्या राहण्याच्या ठिकाणी आलो रात्रीची ओळखपरेड च सेशन झालं हरिश्चंद्राच्या मंदिरातील आरतीच्या नादाने तर संपूर्ण गड परिसर दुमदुमला होता ....बाकीचे आलेले ग्रुप सुद्धा आम्हच्या ह्या कामात सहभागी झाले.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :-
तळापासून या मंदिराची उंची साधारणत… सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रकाराची भिंत आहे. या प्रकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ’मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणार्‍या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनी खाली एक खोली आहे, यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ’चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केलं होते अशी स्थानिक गावकर्‍यांची श्रध्दा आहे असे म्हणतात.
रात्री सर्वजण झोपली आणि मीसुद्धा पण समाधानाने काहीतरी नवीन मिळाल्याचं 
सकाळ झाली तेव्हा मी उठलेलो होतो पण बाकीच्या लोकांना उठवण्याच्या फंदात पडलो नाही....पोपटरावांशी गप्पा मारण्यात मी मग्न झालो.... हे कुटुंब म्हणजे येणाऱ्या प्रवाशांच्या पोटाची खळगी भरण्याच काम करतात दिलखुलास कुटुंब आहे हे कमीत कमी साधनांमध्ये सुखी कस राहावं ह्याच उत्तम उदाहरण! असे अनेक प्रसंग आहेत माझ्या अनुभवाच्या पोतडी मध्ये मग ती रायगडावरची ताक विकणारी आज्जी असो तोरणा च्या प्रवासातला मी नॉनव्हेज खात नाही कळल्यावर तातडीने 'व्हेज' भाजी बनवणारी वहिनी असे अनेक प्रसंग आपुलकीची प्रचिती देतात....हळू हळू सगळेच उठले आपलं आवरून नास्ता झाल्यावर मग आम्ही तारामतीच्या शिखरावर जायला निघालो सचिन शेठ ने तर संपूर्ण 5 लिटर कोकम चा सरबत बनवलं होत....
तारामती शिखर:-
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. याची … उंची साधारणत: ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुंफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे.याच गणेश गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाइनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.
तारामती पाहून झाल्यावर ग्रुप मधल्या लोकांची बालेकिल्ल्यावर जाण्याची इच्छा नव्हती म्हणून मग तो आम्ही रद्द केला आणि गड उतार व्हायच्या तयारीला लागलो,ग्रुप मधल्या मुलींनी मात्र हद्दच केली मेकअप करण्यात तब्बल दिडतास घालवला ....अनेकांना प्रश्न पडला उतरण्यासाठी पण मेकअप! बापरे पचायला जडच होतं पण पर्याय नव्हता मुलीच त्या ऐकणार त्या मुली कुठल्या? निदान मेकअप च्या बाबतीत तडजोड नकोच असते.
हुश्श ! शेवटी तयार झाल्या एकदाच्या आणि आम्ही उतरायला सुरुवात केली उतरताना मात्र परीच्या मस्ती मूळे दीपा पडली आणि पायाला मुकामार लागला मग तिला उचलून आणावं लागलं.... येताना कोतुळ ला दवाखान्यात उपचार केले आणि निघालो....रात्री येताना ठरल्याप्रमाणे श्री.हरी....ला जेवण आणि तळेगांवी पोहचलो.
समाप्त_________








Comments

sagar kunjir said…
ओढा नाही मुठा नदीचा उगम आहे. ही नदी संगमनेर पासून वाहत जाते

Popular posts from this blog

सांधण व्हॅली... प्रथम चरण

आठवणीतला 'राजमाची'