रतनगड! रत्न सह्याद्रीचे
सह्याद्री! एक प्रेरणा स्थान,एक शिक्षक,अभिमान,स्वाभिमानाचा धगधगता यज्ञ! त्याने बळ दिल ते हिंदवी स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपतींना,त्याने बळ दिलं ते त्या "देश धर्म पर मिटने वाले छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांना, त्याने बळ दिलं ते स्वराज्य पोरकं झालं असतानाही स्वराज्य लढवत ठेवणाऱ्या लक्ष लक्ष मावळ्यांना...आणि आजही तोच बळ देतोय तो आमच्या सारख्या ट्रेकर्स ला.. सह्याद्रीला आपल्या पितृस्थानी मानून अनेक माझ्यासारखे "चिरंजीव" इथे मोकळा श्वास घेतात, अश्याच चिरंजीवांची मिळून तयार झालेली "मैत्री संस्था" आणि ही संस्था अनेकांना ह्या मोकळया श्वासाची संधी देत असते आणि घेत असते ...अशा आजवर आम्ही अनेक संधीचे साक्षीदार झालोत आणि केलेही आणि हीच पुन्हा एकदा संधी स्वतःहून आमच्या कडे चालून आली ती रतनगडाच्या स्वरूपात वास्तविक रतनगडचा ट्रेक ह्या आधीही संस्थेचा झाला होता पण आताची नवीन मंडळीं पैकी त्यावेळी बहुतेक जण नव्हतेच ....म्हणून परत एकदा हाच किल्ला करायचा अस ठरलं बैठकीत ..आणि आम्ही सगळे कामाला लागलो..तारीख ठरली 28,29,30 एप्रिल 2017 दरवेळी मे महिन्यात ट्रेक घेऊन जातो,खास लोकाग्...