रतनगड! रत्न सह्याद्रीचे




सह्याद्री! एक प्रेरणा स्थान,एक शिक्षक,अभिमान,स्वाभिमानाचा धगधगता यज्ञ! त्याने बळ दिल ते हिंदवी स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपतींना,त्याने बळ दिलं ते त्या "देश धर्म पर मिटने वाले छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांना, त्याने बळ दिलं ते स्वराज्य पोरकं झालं असतानाही स्वराज्य लढवत ठेवणाऱ्या लक्ष लक्ष मावळ्यांना...आणि आजही तोच बळ देतोय तो आमच्या सारख्या ट्रेकर्स ला..
सह्याद्रीला आपल्या पितृस्थानी मानून अनेक माझ्यासारखे "चिरंजीव" इथे मोकळा श्वास घेतात, अश्याच चिरंजीवांची मिळून तयार झालेली "मैत्री संस्था" आणि ही संस्था अनेकांना ह्या मोकळया श्वासाची संधी देत असते आणि घेत असते ...अशा आजवर आम्ही अनेक संधीचे साक्षीदार झालोत आणि केलेही आणि हीच पुन्हा एकदा संधी स्वतःहून आमच्या कडे चालून आली ती रतनगडाच्या स्वरूपात वास्तविक रतनगडचा ट्रेक ह्या आधीही संस्थेचा झाला होता पण आताची नवीन मंडळीं पैकी त्यावेळी बहुतेक जण नव्हतेच ....म्हणून परत एकदा हाच किल्ला करायचा अस ठरलं बैठकीत ..आणि आम्ही सगळे कामाला लागलो..तारीख ठरली 28,29,30 एप्रिल 2017 दरवेळी मे महिन्यात ट्रेक घेऊन जातो,खास लोकाग्रहास्तव ह्यावेळी लवकरच म्हणजे एप्रिल महिन्यातच हा ट्रेक ठरवला...तयारी सुरू झाली नावं, शुल्क जमा होत होते आणि आम्ही सर्वचजण आपापल्या परीने तयारी करीत होते ...पण माशी शिंकली ! मला सुट्टी मिळणार नाही अस फर्मान आलं ...बोंबला आता काय ? मंदारला सांगितलं अपेक्षेप्रमाणे त्याने शिव्याला सुरुवातच केली शिव्या देत होताच पण म्हणाला "तुला सोडून जाणार नाही तु काहीही कर..." काय करू शकतो ??  आणि जायचंच ट्रेकला ह्या निर्धाराने पर्यायांची चाचपणी सुरू झाली अनेक पर्याय समोर आले... एक पर्याय मी निवडला 'न सांगता सुट्टी मारण्याचा, आणि ह्या कामात मला मदत केली ती माझ्या सहकार्याने... तो दिवस उजाडला ....दिवसा काम करून घरी गेलो आणि बॅग आधीच तयार होती उचलली की चाललो, माझ्या बरोबर प्रथमच येणारा माझा मित्र कुंभार तेजस ह्याला आधीच कल्पना देऊन ठेवली होती ह्या सगळ्या प्रकाराची कारण हे "हेकण" माझ्याच बरोबर कामाला होत...म्हणून त्याने घोळ घालू नये म्हणूनची ही सगळी मेहनत ...असो नेहमीसारखा पोहोचलो मी आणि तेजस तळेगावला....बस ही आली पण म्हणतात ना "नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न" जी बस पाहून ठरवली होती ती आलीच नाही भलतीच बस आम्ही पाहत होतो ...फक्त समाधान एकच जी आली होती ती व्यवस्थित होती म्हणून जास्त कुरबुर न करता ...बसलो आणि इतरीही मंडळी बसली ...पण मुळातच हा प्रकार मला आवडला नव्हता कारण हा प्रकार व्यवहारी पणाच्या कक्षेच्या बाहेर होता. परत येईन त्यावेळी त्याची बसवाल्याची कांन उघडणी करायची हे नक्की केलं....
बस निघाली नेहमी प्रमाणे नारायण गाव ला चहा,दूध घेतलं ह्या दरम्यान मी आमच्या साहेबांना "टेक्स्ट मेसेज" 2 दिवस येत नसल्याचा पाठवला ...आणि त्याच कारणही स्पष्ट केलं का नाही ते... जे की खोटं पण आपल्याकडे युद्धात आणि प्रेमात सारकाही माफ असतं इथे तर आमचं प्रेम आम्हाला खुणावत होत...त्याचा "सिग्नल" कसा तो(सो)डणार.... 29 ला सकाळी गाडी रतनवाडीत पोचली आमच्यातले काही बहाद्दर मंडळी नैसर्गिक विधी च्या नावाखाली "अमृतेश्वर मंदिर" पाहायला गेले काय ती हौस....मंदिर बघायचं हे बैठकीत ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी होत..."उतावीळ नवरे ...." आधीच गेले मग परत माझ्यातला "हिटलर" जागा झाला...सगळ्यांना बोलवे पर्यंत बाकीच्यांनी न्याहारी उरकून घेतली  आणि आम्ही किल्ला चढायला प्रारंभ केला...किल्याची चढण उंच होती कारण किल्ल्याची उंची 4255 फूट जी की कमी नव्हती ...उशीर होऊ नये म्हणून सगळ्यांना निघणं गरजेचं होतं आम्ही चढणीला सुरुवात केली ...
पोहोचण्याच्या वाटा :
१) रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून :- एक वाट रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून जाते. या वाटेने गडावर जातांना ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी २ तास लागतात. वाट सोपी आहे. 
२) शिडीची वाट :- ही वाट गडाच्या डावीकडून जाते. या वाटेने गडावर जातांना दोन शिड्या लागतात. गडावर जाण्यास साधारण २ तास पुरतात, वाट तशी सोपी आहे.
आम्ही शिडीच्या वाटेची निवड केली होती आणि एक एक करत सर्वजण वर पोहचत होते सुरवातीला मंदार,श्रीराम,डॉ.विजय....अशी मंडळी वर पुढे होती,माझ्या बरोबर दोन्ही शरयू होत्या एक गायक तर दुसरी भारतीय इतिहास चा अभ्यास करणारी...दोघीही अफलातूनच...आमच्या गायक शरयू शी तशी ओळख जुनीच...पण ह्या इतिहास च्या विद्यार्थिनीशी चालता चालता ओळख झालेली...तिच्याशी चटकन ओळख होणं हे स्वाभाविक होत "इतिहास" हा माझाही आवडता विषय त्याच्याशी संबंधित कुठल्याही गोष्टी बद्दल मला कायमच कुतूहल राहिलंय ..तर असा आमचा प्रवास चालू असताना गप्पा,मस्करी, टिपिकल लेव्हलचे पीजे अस चालूच होत, काही वेळाने आमच्या पुढे गेलेली मंडळी थकली म्हणून बसलेली दिसली ...आणि आम्ही त्यांना गाठलं, खरं तर मी सर्वात शेवटी होतो कारण ह्यावेळी हुसकायच काम माझ्याकडे होत...पण आता ही मंडळी बसली आणि मी पुढे निघून आलो...त्यातल्या काहींना घेऊन ,शिडीच्या मार्गाने गडावर जातांना प्रवरा नदीचे पात्र आपणा बरोबरच धावत असते. हा रस्ता घनदाट जंगलातून जाणारा आहे. साधारण दुसर्‍या पठारावर आल्यावर डावीकडे सरळ जाणारी वाट हरिश्चंद्रगडाकडे घेऊन जाते, तर समोरच्या वाटेने शिडी चढून गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडची वाट गुहांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट गडाच्या दुसर्‍या दरवाजाकडे जाते,
शिडीच्या जवळ येऊन थांबल्या वर  बाकी सर्वांना वर जाऊ दिल आणि मी मागे असलेल्या लोकांची वाट पाहत थांबलो ...पण काही वेळाने मीही गुहेत जाऊन थांबावं म्हणून निघालो गुहेत पोचल्यावर संपदा मात्र नंतर पाणी मागत आली तिने अश्विनला dehydration झाल्याचं सांगितलं मग त्याला पाणी आणि ओआरएस अस पाठवून दिल आणि मी, रोहन भाजी बनवायच्या कामाला लागलो कारण अश्विन भाजी बनवणार होता तोच dehydrate झाला होता ...बाकी सगळी लोक मात्र आल्या आल्या झोपली होती मस्त...मला आल्यावर हे सगळं एकूणच खटकलं ...दमली असतील ह्या विचाराने मीही काही बोललो नाही...त्यात भाजी बनवायची होती म्हणून भाजी बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं....हे सगळं चालू असताना इथे काही अनाहूत पाहुणेही आले ती माकडं! त्यांची आल्या आल्या लगबग चालू झाली होती काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने त्यामुळे त्यांनी काही आमच्या सामानातला काही नेऊ नये म्हणून त्यांच्या रविशा आणि रॉनी ला लक्ष ठेवायला सांगितलं तरीही माकडांनी आमची संपूर्ण 2 किलो ची तांदळाची पिशवी पळवलीच... असे हे बहाद्दर! काय म्हणावं ह्यांना,भाजी होई तोपर्यंत अश्विन वर पोहचला होता... आल्यावर त्याला आराम करायला सांगून बाकी मंडळींना जेवायला बसवलं तर तिथे ही सगळी निरुत्साही सगळे,काही जेवले काहींना जबरदस्ती बसवलं...आणि मग लोकांना किल्ला पाहायचं अस सांगून तयार राहायला सांगितलं 4-5 जणांनी तर नको जायला हा सल्लाही मला दिला मग जबरदस्ती सगळ्यांना उठवून किल्ला पाहायला पाठवलं... दुसर्‍या दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला भग्नावस्थेतील गोल बुरुज दिसतो, येथेच पाण्याची दोन ते तीन टाके आहेत, येथून थोडे पुढे गेल्यावर वाटेत इमारतीचे अवशेष आढळतात. साधारणत: १० मिनिटे चालल्यावर डावीकडील बाजूस साम्रद गावाकडील कोकण दरवाजा लागतो, दरवाजा उध्वस्त स्थितीत आहे, येथून उतरणारी वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. या वाटेने उतरणे धोकादायक आहे. येथून पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. पुढे आणखी थोडे गेल्यावर अनेक टाक्यांची रांगची रांग आढळते. याच मार्गाने पुढे गेल्यावर गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे आढळते. नेढ्यातून चहू बाजुंचा परिसर दिसतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो. डावीकडे खाली चांगल्या स्थितीतील दरवाजा आहे. ३० ते ४० कातळात कोरलेल्या पायर्‍याही आहेत. संपूर्ण दरवाजा कातळात कोरलेला आहे. दरवाज्यातून खुट्टा सुळक्याचे दर्शन घडते. नेढ्याच्या दुसर्‍या बाजुने उतरल्यावर अर्ध्या तासावरच प्रवरा नदीचे उगमस्थान आहे. संपूर्ण गड पाहण्यास दोन तास लागतात. नेढ्यातून येणारा वारा झेलून तृप्त झाल्यावर आम्ही परत गुहेकडे यायला निघालो सूर्यनारायण अस्ताला चालले होते आकाशामध्ये मस्त केसरी रंगाची झालर लागलेली होती...ते पारणं फेडणार चित्र पाहून "ह्याचसाठी केला होता अट्टाहास" ह्याची प्रचिती आली ...आणि आम्ही परत गुहेत आलो...गुहेत आल्यावर अश्विन चांगलाच स्थिरावला होता वास्तविक तो आमच्या बरोबर किल्ला पाहायला आला पण तो अजूनही दमलेलाच गुहेत येई पर्यंत तो अगदी निवांत झाला त्याच उत्साहात त्याने आता आपली जवाबदारी पार पाडायला सुरुवात केली जेवण बनवण्याची ...पण बाकी मंडळी परत झोपली ! अरे ही काय पद्धत झाली? मग न राहवून मी सगळ्यांनाच बोललो "जर झोपायचंच होत तर एवढे कष्ट करून वर यायची काय गरज??? घरी झोपायचं... घरच्या चांगल्या गाद्या सोडून इथे कशाला दगडावर यायचं झोपायला " अर्थात माझी चीड ही आखलेली योजना ही फसत  होती ...म्हणूनची होती,दरवेळी मंदार काहीच कोणाला बोलत नाही....असो मग अश्विन बोलल्यावर सगळे उठले जो खेळ आम्ही ठरवला होता तो खेळायला सुरुवात केली...4 संघ तयार करून जास्तीत जास्त किल्यांची नावे लिहून त्यातल्या एका किल्यावर कोणीही बोलायला हवं ...मग त्याच्याशी संबंधित माहिती असेल,त्याचा इतिहास,त्याच महत्व असेल हे प्रत्येक संघाने जवळ जवळ 3-4 किल्याची कमी-जास्त प्रमाणात माहिती सांगितली एकूणच जो हेतू ह्या खेळाचा होता तो साध्य झाला होता...आणि शेजारी असलेल्या मंदिरात आरती,प्रार्थना, गणपती स्तोत्र,रामरक्षेनंतर जेवण करून प्रत्येकजण हा झोपायला सज्ज झाला माझ्यासाहित...मी,रविवार ,सूर्यनारायण आणि अमृतेश्वर असे चौघेही दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होतो आपापली कर्तव्य बजावण्यासाठी.....
दुसऱ्या दिवशी सर्वांचं उठणं तस निवांतच झालं चहा न्याहारी झाल्यावर निघायचं हेच ठरलं होतं...त्याप्रमाणे सर्व जण आम्ही उतरायला सुरुवात केली मंदार,विजय अशी मंडळी ही कल्याण दरवाज्यातून उतरणार म्हणाली ...मलाही इच्छा होती पण मंदार उतरणार होता मग मी माझा निर्णय बदलला आणि सगळ्यांच्या बरोबर उतरायला सुरुवात केली.उतरताना फारच वेळ घेतला आम्ही ...दुपारचे 4 वाजले त्यानंतर आम्ही अमृतेश्वराच्या दर्शनाला आणि मंदिर पाहायला सगळ्यांनाच पाठवलं सगळे गेले मी मात्र शरयुकडून त्या मंदिराबद्दलची माहिती ऐकत होतो (त्यातल्या काही भाग इथे देतो आहे ) हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम आढळते. यामध्ये यक्षकिन्नरच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन, मुक्त शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिराच्या बाजुलाच प्रशस्त अशी पुष्करणी आहे, यालाच विष्णुतीर्थ असे म्हणतात. यात विविध प्रकारच्या मूर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. विष्णु आणि गणपती यांनी शस्त्रे धारण केलेल्या मूर्त्या आहेत...हे बघून झाल्यानंतर मग मात्र न्याहारी साठी सगळ्यांना परत एकत्र करून न्याहारी केली "दडपेपोहे" खायला उत्तमच ....आणि मग मात्र ढगांनी गडगडायला सुरुवात केली आणि पाऊस पडणार हे निश्चित झालं...मग सगळ्यांना बस मध्ये बसवलं आणि पावसाने हजेरी लावली तीही आपल्या रुबाबात ,तुफान पाऊस सुरू झाला खरं तर गाडीतल्या लोकांना चहा पिण्याची फारच इच्छा होती पण मी नाही कोणाला चहा पिऊ दिला कारण १.बाहेर पाऊस पडत होता जो खूपच जोरात होता परत जेवण्यासाठी हॉटेल मध्ये पोहोचणं ही गरजेचं होत २. जर आता पावसात सगळे उतरले तर परत ओले होऊन सीट वर बसता आलं नसतं... हीच कारण होती की मी कोणाला चहा पिऊ नाही दिला ...म्हणालो पुढे गेल्यावर पिऊ चहा मुख्य रस्त्याला लागण गरजेचं होतं तेच माझं मुख्य टार्गेट होत...किंवा मग "अकोले" पर्यंत तरी, पण माझ्या ह्या निर्णयावर ऐका काकांनी नाराजी व्यक्त केली मंदार जवळ,तस मंदार मला म्हणाला"पुढे गाडी थांबावं हॉटेलपाशी,लोकांना चहा प्यायचाय" मी मला थोडं विचित्र वाटलं आणि राग ही आला पण मंदारला म्हणालो "गाडी आता थांबणार नाही ती थेट अकोले ला थांबेल आणि चहा सुद्धा तिथे पिऊ"
         अपेक्षेप्रमाणे रस्त्यात पावसाने झाडं उन्मळून पडली होती आणि त्यामुळे ट्रॅफिक सुद्धा जॅम होत...पण मला मात्र माझ्या निर्णयाचं समाधान वाटत होत आम्ही वेळेत अकोलेला पोहचलो होतो...अकोले मध्ये आमचे परिचित डॉ. आहेत त्यांनीच आम्हाला अकोले मध्ये थांबायला सांगितलं होतं आणि त्यांचा विनंती ला प्रतिसाद म्हणून आम्हीही थांबलो मग मात्र तिथे सगळ्यांना चहा दिला आणि पैसे मात्र त्या डॉक्टरांनी दिले त्यांना नको म्हणत असताना पण Oत्यांनी ते दिले ...आत्तापर्यंत ह्या ट्रेकच्या माध्यमांतून आम्हाला जी चांगली लोक मिळाली त्यातीलंच हे एक डॉक्टर...चहा नंतर मात्र सगळ्यांना तरतरी आली मग बस मध्ये नाचगाणी,मैफिल अस एक धांगडधिंगा सुरू झाला ते हॉटेल येई पर्यंत हॉटेल श्री हरी पांडुरंग (पुण्याकडून नाशिकला जाताना  आळेफाट्या पासून साधारण 4 किलोमीटर अलीकडे अंतरावर असणार हे हॉटेल) हॉटेल मालक सुद्धा तेवढेच मनमिळाऊ ह्याच जेवण म्हणजे आमच्या ट्रेकमधला कळसच जेवणात कुठेही फरक नाही वाढणाऱ्यांची किरकिर नाही.कुठल्याही पदार्थ सांगा त्याच उत्कृष्ट चवीने बनवणार...आणि वाढणार सुद्धा ...असो आमच जेवण झाल्यावर आम्ही तळेगावी पोहचलो.पुण्यातली मंडळी बस पुण्यातून असल्यामुळे आम्हाला सोडून आपापल्या घरी पोहचली ...त्यांची खबरबात कळाल्यावर मीही घरी निवांत झोपलो...
समाप्त...
किल्यांची माहिती साठी Trekक्षितिज चे विशेष आभार
माझा ट्रेक ....माझं शब्दांकन
माझीTrekkvat


रतनगड.....

Comments

sharover said…
Khup sundar kathan. Trek cha anubhav sundar mandlay. Thank you for sharing. Waiting for more treks and experiences.

Popular posts from this blog

सांधण व्हॅली... प्रथम चरण

आठवणीतला 'राजमाची'

रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)