Posts

रतनगड! रत्न सह्याद्रीचे

Image
सह्याद्री! एक प्रेरणा स्थान,एक शिक्षक,अभिमान,स्वाभिमानाचा धगधगता यज्ञ! त्याने बळ दिल ते हिंदवी स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपतींना,त्याने बळ दिलं ते त्या "देश धर्म पर मिटने वाले छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांना, त्याने बळ दिलं ते स्वराज्य पोरकं झालं असतानाही स्वराज्य लढवत ठेवणाऱ्या लक्ष लक्ष मावळ्यांना...आणि आजही तोच बळ देतोय तो आमच्या सारख्या ट्रेकर्स ला.. सह्याद्रीला आपल्या पितृस्थानी मानून अनेक माझ्यासारखे "चिरंजीव" इथे मोकळा श्वास घेतात, अश्याच चिरंजीवांची मिळून तयार झालेली "मैत्री संस्था" आणि ही संस्था अनेकांना ह्या मोकळया श्वासाची संधी देत असते आणि घेत असते ...अशा आजवर आम्ही अनेक संधीचे साक्षीदार झालोत आणि केलेही आणि हीच पुन्हा एकदा संधी स्वतःहून आमच्या कडे चालून आली ती रतनगडाच्या स्वरूपात वास्तविक रतनगडचा ट्रेक ह्या आधीही संस्थेचा झाला होता पण आताची नवीन मंडळीं पैकी त्यावेळी बहुतेक जण नव्हतेच ....म्हणून परत एकदा हाच किल्ला करायचा अस ठरलं बैठकीत ..आणि आम्ही सगळे कामाला लागलो..तारीख ठरली 28,29,30 एप्रिल 2017 दरवेळी मे महिन्यात ट्रेक घेऊन जातो,खास लोकाग्...

आठवणीतला 'राजमाची'

Image
ट्रेकवाटेवरच पहिल पाऊल...... MileStone पहिला  "अरे केदार जायचंय नाही का तुला?" अशी आजीची हाक ऐकल्या बरोबर,थोड्या वेळा पुर्वी पतंग उडवण्यासाठी गेलेलो मी खाली आलो, तयारी केव्हाच झाली होती जायची, पण खेळण्याच्या ओघात, मी निघायचं विसरु नये आणि सोबत न्यायच्या वस्तू विसरु नये म्हणून ती हाक होती.  मामाकडे सुट्टी घालवायला आलेलो मी! सुट्ट्याच होत्या!  म्हणुन मामा म्हणाला "आपण फिरायला जायचंय" आणि मी चमकलो!  लहान होतो त्यावेळीं कधीतरी एकदा मी शाळेच्या सहलीला गेलो होतो 'शिवनेरी' नावाच्या किल्ल्यावर...त्यानंतर ते मामा ने मला "आपण फिरायला जाणार आहोत" सांगेपर्यंत 'सहलीची' ठिकाणं, वेळ असे काही रुसले...कि पावसाची वाट पाहण्या-या चातकाला ढगांनी ठेंगा दाखवुन हिणवाव आणि तेत्या चातकाने ते हतबल होऊन पहात रहावं'....        जाणार कुठे तर "राजमाची" नावाचा कुठलासा किल्ला होता लोणावळ्याजवळचा इतकीच माहिती मिळाली होती मला आणि माझ्यासोबत येणारे अजुन दोन सोबती माझी बहिण श्रुती व मंदार नावाचा नुकतीच ओळख झालेला मिञ , असे आम्ही तिघे जण आम्ही आमच्या ...

आनंदाची 'शिखर' चढाई (कळसूबाई मोहीम)

Image
कळसूबाई शिखर बद्दल ..... कायमच एक अप्रूप राहिलेलं आहे....मग ते सोशल मीडिया वर प्रसिद्ध झालेले फोटो असतील म्हणूनही असेल किंवा मग महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर ...म्हणून नाहीतर मग त्याला महाराष्ट्राचं माऊंट एव्हरेस्ट म्हणतात म्हणूनही असेल कदाचित , आहे हे...नक्की . गेल्या १६-१७ वर्षाच्या प्रवासात अनेक वाटा पायाखालून गेल्या चांगले बरे वाईट घटनांचे 'पुल' ओलांडले गेले पण कळसूबाई शिखर मात्र कायमच माझ्या पासून ४ पावलं दूर राहिलेलं आणि गेल्या २ वर्षा मध्ये तर निसर्गानेही स्वतःला रिसेट केलं....आणि आम्ही ट्रेकर्स ने सुद्धा स्वतःला... "लॉक" असलेले ट्रेकर्स  नव्याने तयारीला लागली....आणि आम्ही पण ! गेली २ वर्ष शांत असलेला "Team Management" चा कट्टा "Whatsapp!" म्हणत... मेसेजेस ने सुरू झाला....किल्ला कोणता?  कुठला? हा ..नको....तो किल्ला करू....पासून सुरू झालेल्या चर्चेच्या बैठका ह्या 'कळसूबाई शिखर' नावावर थांबल्या.... माझ्या मनात मात्र ह्या वेळी वेगळच द्वंद सुरू होत...मला कसलीच जबाबदारी नको होती...माझ्या एकंदरीत कामाचा अनुभव...आजवर 'किल्ला प...

रौद्र की रुद्र (कोकणकडा सफर)

Image
झोपण्याची व्यवस्था बघून झाल्यावर जेवण करून सगळी जण सुस्त झाली होती काहींनी दुपारच्या वेळेत खेळायला सुरुवात केली खेळणं आलं की धिंगाणा.... मस्ती.... ओरडणं आलचं तसचं ते इथे होत होतच मी मात्र ह्या सगळ्यात होतो पण सगळ्यापासून तटस्थ होतो कारण मी टीम लीड करत होतो ह्या भूमिकेत कितीही इच्छा असली तरी तटस्थ राहवच लागत ह्यात अनेक मतांतरे असतील प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते नव्हे तरी असायलाच हवी कारण आपण स्वतः कुठे कमी पडतोय आणि आपल्या मर्यादा काय हेही स्पष्ट होत   ...कारण ती जवाबदारी असते आणि ती योग्य पद्धतीने पार पडावी ही प्रामाणिक इच्छा! हा माझा स्वभाव माझ्या मित्रांना सुद्धा माहिती आहे, म्हणूनच ते माझ्या निर्णयाला पाठिंबा देत आलेत आणि आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत चा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत आलोय असो हे झालं माझं मत बाकीच्यांचा दृष्टीकोन कदाचित वेगळा असेल ह्या सगळ्याकडे बघण्याचा, माझं मात्र तटस्थ राहण्याचं कारण खेळण्याच्या ओघात पुढील कार्यक्रमाच नियोजन फसू नये आणि तो वेळ वाया जाऊ नये म्हणून .....खेळणं बंद झाल्यानंतर अर्थात ते बंद करणारा मीच 'हिटलर ऑफ ग्रुप' आणि त...

ट्रेकर्स 'लॉक'..... ट्रेकिंग 'डाउन'

Image
ट्रेकर्स 'लॉक'..... ट्रेकिंग 'डाउन' दिवाळी ट्रेक उत्तम पार पडला आणि नवे ट्रेक्स डोक्यात आकार घ्यायला लागले राजगड-तोरणा,अलंग मदन कुलंग..... मग कोल्हापूर जिल्हा की सोलापूर जिल्हा की सातारा हेच विषय डोक्यात चालू असताना,ह्या सगळ्यात नशिबाने आम्हा सगळयापुढे एक आव्हान उभं केलं आणि ते आव्हानं म्हणजे "कोरोना व्हायरस" ह्या एका संकटाने सगळ्यांना घरात बसवलं पण नुसतंच बसवलंच नाहीतर ज्या लोकांनी प्लॅन केले होते ते एका झटक्यात मातीमोल झाले साहजिकच आमच्या सारखे सतत भटकंती चा विचार करणारी 'भटकी जमात' सुद्धा सापडली आणि अजूनही आहे ह्याच वाईट वाटणं स्वाभाविक होत कारण गेल्या १०-१२ वर्षात ह्यात खंड पडला नव्हता किंवा गोनीदांच्या भाषेत सांगायच झाल्यास विक्रम-वेताळच्या दिनचर्येत खंड पडला नव्हता आणि अश्या परिस्थितीला सामोरं पुर्णपणे अनपेक्षित होत.... असो पण एक नागरिक, ट्रेकर ,भटकती आत्मा म्हणू हवं तर किंवा निसर्गाच्या सानिध्यात वावरणारी माणसं.....ह्या लॉकडाउन मध्ये फिरण्यावर बंधन आली आहेत किल्ले,ऐतिहासिक स्थळे बंद आहेत आणि नुसत्या गुगल अर्थ वर ठिकाणं बघणं ही स्वभा...

सांधण व्हॅली 2.0

Image
 हो नाही ,हो नाही म्हणता  सांधण व्हॅली चा ट्रेक ठरला, शंकाकुशंकानी प्रभावित झालेला हा ट्रेक खऱ्या अर्थाने होतो की नाही ? ह्या टप्यावर येऊन पोहोचला होता...त्याला कारणही तशीच अगदी! पावसामुळे रद्द होणारी लोकं त्यातुन निर्माण झालेलं गोंधळाचे वातावरण, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किती लोक येणार ह्याच मुद्यावर अडकलेली 'गाडी'अखेर 11च्या सुमारास 19 लोकांच्या साथीने 'साम्रद' गावाच्या दिशेने धावायला लागली,मग नारायणगाव येथील  चहा,दूध असा ठरलेला शिरस्ता ....पण वाटेत पहाटे 5 पर्यंत पडत असलेला पाऊस,पावसाच्या पडणाऱ्या थेंबांबरोबर मनात सुद्धा भीतीचा चालणारा पाठशिवणीचा खेळ.... हे सगळंच परिस्थितीच्या विरुद्ध होतं... पण 'इरादे हे फौलादी ,हिम्मते हर कदम' ह्या अविर्भावात असलेली आम्ही मंडळी ह्या टप्यावर सुद्धा न खचता जायचंच ! ह्याच निकराने निघालो होतो, आणि 6 च्या सुमारास..  कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात  प्रवेश करताच सुुर्यानारायणाने आपल्या किरणांच्या रूपाने आम्हाला आमंत्रणच दिलेे मग मात्र आत्मविश्वासाने जी काही 'हनुमान उडी मारली' की हा ट्रेक आपला पुर्ण होणार ह्याची ...

हरिहर आणि ब्रम्हगिरी

Image
वाटाड्याच पहिलं पाऊल.... "सौंदर्य" कस असावं?तर त्याचा मर्म आणि धर्म दोन्ही मुळचेच सुंदर असणं किंवा सर्व स्तरावर उच्च कोटीची  सुंदरता....हिच त्याची व्याख्या,  "हरीहर" आणि "ब्रम्हगिरी" ह्यांना चपखल बसते.... आमच्या "सांधण व्हॅलीच्या" ट्रेक नंतर मे महिन्यातल्या आमच्या पुढचा "रांगणा किल्ल्याचा" ट्रेक कमी संख्येअभावी रद्द करावा लागला आणि  ह्या नंतर,ट्रेक कुठे न्हायचा?असा प्रश्न उदभवलाच नाही कारण मंदार भावे ते काम १००% चोख करतो आणि त्यान सांगितले "हरीहर" आणि "ब्रम्हगिरी" करु.....नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हे किल्ले...ठरलं मग! मागचा अनुभव (सांधणव्हॅली चा) लक्षात घेता पायलट ट्रेक न करता कुठलाही किल्ला निश्चित करायचा नाही ही काळ्या दगडावर पांढरी रेघच मारुन ठेवली!      पुढे कोणी पायलट ट्रेक करावा? ह्या चर्चेचा शेवट तेजा(तेजस गुरव) आणि अॅशले(अश्विन गंगाणी) ह्यांचा नावावर येऊन थांबला तेजस,अॅशले आणि तेजसचा रोहन नावाचा मित्र हे पायलट ट्रेकला गेले.हे जाऊन आल्यावर किल्ला "मस्त,छान,चांगला,सुंदर" ह्या...